PM Modi and CM Fadnavis discuss flood relief and upcoming fintech festival during a crucial meeting in Delhi Saam Tv
Video

शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार? PM मोदी आणि CM फडणवीसांमध्ये काय चर्चा झाली? VIDEO

Will Farmers Get Financial Aid? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. राज्यातील पूरग्रस्त भाग, शेतकऱ्यांची स्थिती आणि केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या मदतीवर सविस्तर चर्चा झाली.

Omkar Sonawane

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत त्यांना राज्यातील झालेल्या पूरग्रस्त भागात झालेल्या नुकसानीची माहिती दिली. तसेच केंद्र सरकरकडून आर्थिक मदत मिळावी असे निवेदन दिले. फडणवीस आणि मोदी यांच्यामध्ये एक तास चर्चा झाली. या भेटीनंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि सविस्तर माहिती दिली. फडणवीस म्हणाले, मोदी 8 आणि 9 ऑक्टोबरला महाराष्ट्रात येणार आहे.

महाराष्ट्रात मोठा फिंटेक फेस्टिवल होणार आहे. त्यासाठी मोदी राज्यात येणार असून ब्रिटनचे पंतप्रधान देखील येणार आहे. सर्वात फिंटेकची जास्त गुंतवणूक ही महाराष्ट्रात होणार आहे. तसेच राज्याला भरीव निधी मिळावा अशी विनंती केल्याचे फडणवीस म्हणाले. पूरग्रस्त भागात जे काही नुकसान झाले आहे त्याचा आढावा घेण्याचे काम सुरू असून त्याची माहिती केंद्र सरकारला दिली जाईल आणि त्यांनंतर मदत मिळेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - सोयाबीन शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार मदत द्या - विजय वडेट्टीवार

निवडणुकीचं बिगुल वाजलं! माजी मुख्यमंत्र्यांच्या पक्षाची पहिली यादी जाहीर, प्रसिद्ध गायकाला मिळाली उमेदवारी

Relationship Tips: सारखं भांडण होतं; नातं घट्ट करण्यासाठी जोडीदारानं कराव्यात या खास गोष्टी

Fake Notes : नकली नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तीन जाणांविरोधात गुन्हा दाखल

Train Ticket Conformation Tips : दिवाळीला गावी जायचंय, पण तिकीट कन्फर्म नाही, 'या' टिप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT