Manasvi Choudhary
उन्हाळ्यात केसांच्या समस्या दिवसेंदिवस अधिकच वाढतात. केस तुटणे, केस गळणे, केसांना फाटे फुटणे या समस्या केवळ महिलांनाच नाही तर पुरूषांना देखील उद्भवतात.
केसांच्या या समस्यांवर तुम्ही घरगुती सोपा उपाय करू शकता. लांब आणि दाट केसांसाठी तुम्ही घरीच रिठा आणि शिकेकाई हेअर पॅक करा.
रिठा आणि शिकेकाई पावडर बनवण्यासाठी तुम्हाला आवळा पावडर, रीठा, शिकेकाई पावडर आणि कडुलिंबाची पावडर हे साहित्य घ्यायचे आहे.
1) एका मोठ्या भांड्यामध्ये आवळा पावडर, रीठा आणि शिकेकाई पावडर मिक्स करा.
2) या मिश्रणात नंतर कडुलिंबाची पावडर मिक्स करा.
3) कोरड्या स्वच्छ डब्यामध्ये तुम्ही पावडर ठेवू शकता.
4) केसांना पावडर लावण्यापूर्वी केस स्वच्छ धुतलेले असणे महत्वाचे आहे.
5) पावडर पाण्यात भिजवून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट केसांच्या मुळांना लावून १०-१५ मिनिटे ठेवा
6) केस धुण्यासाठी तुम्ही कोमट किंवा थंड पाणी वापरा. गरम पाण्याने केस धुणे टाळावे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.