NCP leaders Sunil Tatkare and Praful Patel attend a political meeting amid controversy over timing during Pawar family rituals. Saam TV Marathi News
Video

दादांच्या अस्थी विसर्जनाचा विधी सुरू असताना सत्तावाटपाची घाई; तटकरे, पटेलांवर पवार कुटुंब नाराज ?

Pawar family latest news : अस्थी विसर्जनाचे विधी सुरू असतानाच सत्तावाटपासाठी घाई केल्याने पवार कुटुंब नाराज असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. तटकरे, पटेल आणि भुजबळ यांच्या बैठकीवरून राष्ट्रवादीत नाराजी वाढल्याचे चित्र आहे.

Namdeo Kumbhar

Pawar family upset with Sunil Tatkare and Praful Patel : सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांवर पवार कुटुंब नाराज असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलंय. बारामतीत अजित पवारांच्या अस्थी विसर्जनाचे विधी सुरू असतानाच मुंबईत राष्ट्रवादीचं बैठकसत्र सुरू होतं. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक पार पडली. या बैठकीवरुन पवार कुटुंबीयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दुःखाच्या काळात सत्तावाटपाची एवढी घाई करण्याची गरज काय, असा संतप्त सवाल पवार कुटुंबाकडून करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईमध्ये बैठक पार पडणार आहे. सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांना मुंबईत बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, सुनेत्रा पवार या आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ (Sunetra Pawar deputy CM oath) घेणार आहेत. दुपारी होणाऱ्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होईल, असे सांगण्यात येतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज्यात पुढील आठवड्यात पावसाची शक्यता

Brocoli Soup Recipe: सकाळी नाश्त्याला बनवा ब्रोकोली सूप, ही आहे सोपी रेसिपी

Mumbai Traffic : मुंबईतील वाहतूककोंडीवर तोडगा, वाहतूक पोलिसांनी घेतला मोठा निर्णय, उद्यापासूनच नवीन वाहतूक नियम

Bhiwandi Corporation: भिवंडीतील काँग्रेसचा महापौरपदाचा डाव फसला? समाजवादी पक्षाचे 6 नगरसेवक नॉट रिचेबल

Lapwing Bird: टिटवीचा आवाज ऐकणं शुभ की अपशकुन? जाणून घ्या सत्य

SCROLL FOR NEXT