पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत कोट्यवधी भारतीयांची मान अभिमानाने उंचावणाऱ्या स्वप्नील कुसाळेचे कोल्हापूरात जंगी स्वागत करण्यात आले आहे. स्वप्नील कुसाळेने भारताला २५ मीटर एअर रायफल थ्री पोझिशन्स प्रकारात कांस्यपदकाची कमाई करुन दिली होती. हे भारताचं या स्पर्धेतील तिसरं पदक ठरलं होतं. दरम्यान कोल्हापूरचा डंका जगभरात वाजवल्यानंतर स्वप्नील कुसाळेचे घरी परतल्यानंतर जंगी स्वागत करण्यात आले.
स्वप्नीलचे स्वागत करण्यासाठी कोल्हापूरकरांनी तुफान गर्दी केली होती. करवीर नगरीत परतल्यानंतर स्वप्नीलची एक झलक पाहण्यासाठी आणि त्याला शुभेच्छा देण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत होते. दरम्यान त्याच्या स्वागतासाठी हसन मुश्रीफांनी देखील हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. स्वप्नीलच्या एन्ट्रीनंतर वंदे मातरम हे गाणं वाजवलं गेलं. त्याच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक केलं जातंय. महाराष्ट्रासाठी ही अतिशय अभिमानाची बाब आहे. ताराराणी चौक ते दसरा चौकपर्यंत त्याची मिरवणूक काढली जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.