Pankaja Munde addressing media after allegations related to Dhananjay Munde’s alleged murder conspiracy. Saam Tv
Video

धनंजय मुंडेंचा इंदूरमध्ये हत्येचा कट? पंकजा मुंडेकडून खुलासा, राजकरणात खळबळ|VIDEO

Ratnakar Gutte’s Shocking Allegation: धनंजय मुंडे यांच्या हत्येचा कट रचल्याचा आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केलेल्या आरोपांवर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही नकारात्मक गोष्टींवर बोलत नाही असे म्हणत त्यांनी आरोप फेटाळले.

Omkar Sonawane

माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा इंदूरमध्ये खून झाला असता असा गंभीर आरोप गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी केला आहे. आज नगरपरिषद निवडणुकीचे मतदान होत असून आमदार रत्नाकर गुट्टे हे विविध मतदान केंद्राला भेट देत आहेत. गंगाखेड आणि पूर्णा नगरपालिकेत आमचा विजय होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. तर वेळ पडली तर परळी मध्ये जाऊन धनंजय मुंडे यांच्या विरोधात प्रचार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

भाजप नेत्या तथा मंत्री पंकजा मुंडे यांनी विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेतला आहे. आम्ही बहीण-भाऊ १३ वर्षांनंतर एकत्र येत पॅनल देऊन निवडणूक लढवत आहोत असे सांगत त्यांनी धनंजय मुंडे यांच्यासोबतच्या युतीवर शिक्कामोर्तब केले. आमदार रत्नाकर गुट्टे यांनी धनंजय मुंडे यांच्या हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यावर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्याकडे अशा नकारात्मक गोष्टी येत नाहीत आणि मी त्यावर बोलत नाही असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच खांद्याच्या दुखापतीमुळे (Shoulder Injury) प्रचारात काही काळ विश्रांती घ्यावी लागणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. बीडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीच्या युतीमुळे राजकीय समीकरणे बदलली असून, गणेश पर्वाच्या सभेचा संदर्भही त्यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HSC Board Exam : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आजपासून मिळणार ऑनलाईन हॉल तिकीट; कसं कराल डाउनलोड ? वाचा

Ukadiche Modak Recipe : सारण भरल्यावर उकडीचे मोदक फुटतात? मग 'ही' रेसिपी एकदा फॉलो कराच

Bigg Boss Marathi 6 : पहिल्याच दिवशी सदस्यांची झोप उडाली; बिग बॉसच्या घराचं दार बंद, कोणता टास्क रंगणार?

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना 'या' दिवशी मिळणार ₹३०००; सरकारने उचललं मोठं पाऊल

Maharashtra Live News Update: अजित पवारांचं देवेंद्र फडणवीस यांना शायरीतून प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT