Pankaja Munde and Dhananjay Munde – the Beed siblings who might lock horns once again as NCP chooses to go solo in local elections. Saam Tv
Video

Maharashtra Politics: मुंडे भाऊ-बहीण पुन्हा आमनेसामने? बीडमध्ये महायुतीला मोठा धक्का|VIDEO

Pankaja vs Dhananjay Munde: बीडच्या राजकारणात पुन्हा एकदा मुंडे भाऊ-बहीण आमनेसामने येण्याची शक्यता वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत युती नाकारत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याने महायुतीला मोठा धक्का बसला आहे.

Omkar Sonawane

बीडच्या राजकारणात मोठ्या भूकंपाचे संकेत मिळत असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा देण्यात आला आहे. 'स्थानिक पातळीवर भाजपसोबत युती होता कामा नये, स्वबळावरच निवडणूक लढवली गेली पाहिजे,' अशी स्पष्ट भावना पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत व्यक्त केली आहे. बीड जिल्ह्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पारंपारिक राजकीय वैर असल्याने, महायुती केल्यास पक्षाला मोठा फटका बसेल, असे कार्यकर्त्यांचे मत आहे. या निर्णयामुळे भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यात पुन्हा एकदा थेट लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते यावर अंतिम निर्णय घेणार असले तरी, राष्ट्रवादीच्या या पवित्र्यामुळे बीडमधील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : १४ फेब्रुवारीची ती रात्र, आई वडील चक्क ४ वर्षाच्या बाळाला कॅबमध्ये विसरले अन्...

Gold Rate Today: सोन्याचे दर आज वाढले की घसरले; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Rohit Sharma : रोहित शर्माचा मराठमोळा ठसका, हास्यजत्रेच्या टीमसोबत मारल्या गप्पा| VIDEO

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवजयंती निमित्त वाहतूक बदल, पर्यायी मार्ग वापरण्याचे पोलिसांचे आवाहन

Cervical Cancer Screening: लक्षणं न दिसता शरीरात वाढत राहतो सर्व्हायकल कॅन्सर; ही एक छोटी टेस्ट वाचवेल तुमचा जीव

SCROLL FOR NEXT