MLA Rajesh More inaugurates the long-awaited Palava Bridge, bringing long-overdue relief to daily commuters facing severe congestion on Kalyan-Shil Road. Saam Tv
Video

Kalyan News: कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा! पलावा पुल आजपासून नागरिकांसाठी सुरू|VIDEO

Palava Bridge Inauguration: कल्याण-शिळ रोडवरील वाहतूक कोंडीस अखेर दिलासा मिळाला आहे. आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते आज पलावा पुलाचे लोकार्पण झाले. या पुलामुळे हजारो नागरिकांना वाहतुकीच्या त्रासातून मुक्ती मिळणार आहे.

Omkar Sonawane

कल्याण शीळ रोडवरील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर अखेर तोडगा निघाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला आणि हजारो वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरलेला पलावा पूल आज कल्याण ग्रामीण मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आला.

या लोकार्पण सोहळ्याला स्थानिक नागरिक, कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. पुलाच्या उद्घाटनामुळे कल्याण, डोंबिवली, शीळफाटा तसेच पलावा परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, वाहतूक कोंडीला काही प्रमाणात आळा बसणार आहे.

यावेळी बोलताना आमदार राजेश मोरे यांनी सोशल मीडियावर टीका करणाऱ्यांना नाव न घेता टोला लगावला. आम्ही ट्विटरवर किंवा इन्स्टाग्रामवर टीका करत नाही. आम्ही प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम करतो, हेच आमचं उत्तर आहे, असे ठामपणे सांगत त्यांनी मनसेचे माजी आमदार राजू पाटील आणि ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांना टोला लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: शिवसेनेत जोरदार इनकमिंग; राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का, माजी आमदारानं हाती घेतलं धनुष्यबाण

Local Body Election : सांगली, अमरावती महापालिकेच्या आरक्षणाची सोडत जाहीर; कोणता वॉर्ड कुणाचा?

Congress Leader: एक्झिट पोलनंतर काँग्रेसला दुसरा मोठा धक्का, निवडणूक संपताच बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Akola Crime:धक्कादायक! विद्यार्थिनीवर मास्तराची वाईट नजर; अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Maharashtra Live News Update: ठाण्यातील पार्कमधील इमारतीच्या जाळीला अचानक आग

SCROLL FOR NEXT