dombivali news  saam tv
Video

Pahalgam Terror Attack: कुठे आहेत पंतप्रधान? मतांसाठी आमच्याकडे भीक मागायला येतात पण...; पहलगाम हल्ल्यावर डोंबिवलीकरांचा संताप व्यक्त|VIDEO

Where Is the PM? डोंबिवली येथील मृत नागरिकांचे पार्थिव दाखल झाल्यानंतर तेथील नागरिकांनी सरकारच्या सुरक्षेवर तीव्र संताप व्यक्त करत आपल्या भावना व्यक्त केल्या.

Omkar Sonawane

डोंबिवली: जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भीषण हल्ला करत रक्ताचा सडा सांडला. यामध्ये महाराष्ट्रातील 6 नागरिकांचा मृत्यू झाला असून डोंबिवली येथील तीन मावस भावांची ही सहल अखेरची ठरली. या सगळ्याचा निषेध करत डोंबिवलीकरांनी सरकारच्या प्रति संताप व्यक्त केला आहे. सरकारने उत्तर द्यावे पर्यटकांनी स्वतःचे बलिदान देण्यासाठी काश्मीरला जायचे का? तुम्हाला जर आधीच धमकी आली होती तर तुम्ही तिथली सुरक्षारक्षा वाढवली का नाही? कुठे आहे देशाचे पंतप्रधान? असा प्रश्नांचा भडिमार डोंबिवलीच्या नागरिकांनी सरकारवर केला. मंत्र्यांना जी झेड प्लस सुरक्षा आहे ती काढा आणि सर्व सामान्यांना द्या अशी मागणी स्थानिकांनी केली. मला खुर्ची पाहिजे, आम्हाला सत्ता पाहिजे मतांसाठी आमच्याकडे भीक मागायला येतात असा आक्रोश नागरिकांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपूर नगरी सजली

मोठी बातमी! केंद्रीय मंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा, राष्ट्रपतींकडून मंजुरी, राजकारणात खळबळ

IVF उपचार घेण्याच्या विचारात आहात? कोणत्या टेस्ट होतात, किती येतो खर्च?

जंतरमंतरच्या स्टेजवरच पोलीस कॉन्स्टेबलचा राजीनामा, VIDEO व्हायरल

कलम 324 च्या आडून तुम्ही मनमानी कराल का? SIR च्या ड्युटीवर शिक्षकांना नेमल्याने हायकोर्टाने निवडणूक आयोगाला फटकारलं

SCROLL FOR NEXT