India Destroys Pakistan's Radar System  Saam Tv
Video

Opration Sindoor: ऑपरेशन सिंदूर सुरूच, भारताने पाकची रडार सिस्टिम ड्रोनद्वारे उडवली| VIDEO

India Destroys Pakistan's Radar System: भारताकडून पाकिस्तानविरोधात कारवाई सुरूच आहे. ऑपरेशन सिंदूरअंतर्गत भारताने पुन्हा पाकिस्तानवर ड्रोन हल्ले केले. भारताने पाकची रडार सिस्टिम डोनद्वारे उडवली. त्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

Priya More

भारतीय लष्कराने इस्रायली निर्मित असलेल्या हारोप ड्रोनच्या सहाय्याने पाकिस्तानमधील लाहोरमध्ये हल्ला केला. लाहोरमध्ये या ड्रोनने थेट पाकिस्तानच्या एयर डिफेन्स सिस्टीमवर अचूक निशाणा साधला आहे. इस्त्राइलकडून खरेदी केले जाणारे हारोप ड्रोन हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत. हे ‘किलर ड्रोन’ शत्रूच्या उच्च-महत्त्वाच्या लष्करी लक्ष्यांचा नाश करू शकतात. इस्रायेल एअरोस्पेस इंडस्ट्रीजच्या (IAI) MBT मिसाईल विभागाने विकसित केलेले हारोप ड्रोन हे ‘लोइटरिंग म्युनिशन सिस्टम’ आहे.

हे ड्रोन इलेक्ट्रो-ऑप्टिकल सेन्सर्सने सुसज्ज आहेत. जे शत्रूचे देखरेख केंद्रे व रडार स्थानकांसारख्या उच्च-महत्त्वाच्या लष्करी लक्ष्यांचे निरीक्षण करू शकतात आणि नंतर स्फोट करतात. इस्त्राइलचे हारोप ड्रोन थेट शत्रूच्या लक्ष्यांवर आदळतात आणि त्यांचा नाश करतात. हे इलेक्ट्रो-ऑप्टिकल सेन्सर्सने सुसज्ज असून ते लक्ष्याचा अचूक ठाव ठेऊ शकतात.

हारोप हे एक प्रभावी लोइटरिंग म्युनिशन आहे, जे मानवरहित हवाई वाहन (UAV) आणि क्षेपणास्त्र या दोन्हींच्या क्षमतेचे संयोजन आहे. हे टँक, हवाई संरक्षण प्रणाली, कमांड पोस्ट, पुरवठा गोदामे आणि मानवरहित पृष्ठभागावरील नौका अशा उच्च-महत्त्वाच्या लक्ष्यांचा शोध घेऊन त्यांचा नाश करण्यास सक्षम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माझ्या नादाला लागू नको! राष्ट्रवादीच्या आमदाराचा पक्ष प्रवक्त्याला इशारा; अजित पवार गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

School Timing: कोकणातील 'या' जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत होणार बदल? शिक्षणमंत्र्यांना माजी आमदाराचं पत्र

टीम इंडियाला मिळाला नवा कर्णधार! स्मृती मंधानाकडं महिला क्रिकेट संघाचं नेतृत्व

Pitru Paksha Tv - Mobile Shopping: पितृपक्षात नवीन टिव्ही, मोबाईल फोन खरेदी करावा की नाही?

Ind vs NZ T20 Series : भारतीय संघाची घोषणा; 'पब्लिक डीमांड' खेळाडूचं 4 वर्षांनी जोरदार कमबॅक, पण महारथी संघाबाहेर

SCROLL FOR NEXT