Operation Sindoor saam tv
Video

Operation Sindoor: पाकिस्तानमधील ९ ठिकाणांवर एअर स्ट्राईक, भारतीय लष्कराने व्हिडीओ दाखवले

Operation Sindoor Air Strike: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. केंद्र सरकारने जाहीर केले की मंगळवारी ते बुधवारच्या रात्री १:४४ वाजता पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करण्यात आले.

Dhanshri Shintre

भारताने पहलगाम हल्ल्याचा जोरदार बदला घेतला आहे. केंद्र सरकारने मंगळवार ते बुधवारच्या रात्री १:४४ वाजता प्रसिद्ध केलेल्या निवेदनात सांगितले की पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले झाले आहेत. या कारवाईत १०० पेक्षा अधिक दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे. पत्रकार परिषदेआधी हवाई हल्ल्याचा व्हिडिओही सादर करण्यात आला.

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री, विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती दिली. पहिल्यांदाच भारतीय इतिहासात सशस्त्र दलातील दोन महिला अधिकारी एक वायुदलातील आणि एक लष्करातील पत्रकार परिषदेत सहभागी झाल्या, ज्यामुळे हा क्षण विशेष ठरला.

कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी पीओकेतील दहशतवादी तळांवर झालेल्या कारवाईबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, या ऑपरेशनमध्ये केवळ दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले, पाकिस्तानी लष्कर आणि नागरिकांना नाही. ऑपरेशन सिंदूर पहाटे १:०५ ते १:३० या दरम्यान पार पाडले गेले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुथडी वाहणाऱ्या मिठी नदीत तरूण वाहून गेला, एका दोरीमुळे बचावला; थरारक VIDEO समोर

Viral Video: ‘मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय का? पावसावर तरुणीचा भन्नाट रॅप, सोशल मीडियावर धुमाकूळ

Priya Bapat Photos : प्रिया बापटचा बॉसी लूक पाहिलात का? अभिनेत्रीच्या सौंदर्याने केली जादू

Maharashtra Rain Live News: मुसळधार पावसाने मुंबईची जीवनवाहिनी ठप्प, मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक बंद

Marathwada Rain : मराठवाड्यातील पाण्याची चिंता मिटली; प्रमुख ११ धरणाची शंभरीकडे वाटचाल

SCROLL FOR NEXT