One lakh Rs Tea In Dubai: HT
Video

Gold Tea: बापरे,तब्बल 1 लाख रुपयांचा चहा! EMIवर मिळणार चहा, कुठे आणि कसा मिळतो

One lakh Rs Tea In Dubai: आजवर तुम्ही एक कप चहासाठी किती रुपये मोजले. आठवतंय? ५ रूपये १०,२०. ५०,१०० की मग ५०० किंवा हजार. मात्र आम्ही तुम्हाला १ लाख रुपयाचा चहा दाखवणार आहोत. या चहासाठी ईएमआयचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आलाय. होय तुम्ही जे ऐकताय ते खरंय. पाहुया हा चहा कुठे आणि कसा मिळतो. त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

Snehil Shivaji

आजवर तुम्ही विविध ठिकाणी चहाचा आस्वाद घेतला असेल. चहाच्या टपरीपासून ते तारांकित हॉटेलमध्ये विविध चहाच्या किंमतीही तुम्हाला माहिती असतील. पण तुम्ही कधी १ लाखांचा चहा पाहिलाय? पाहा कुठे मिळतोय हा एक लाखांचा घोटभर चहा.

दुबईत 1 लाखाचा चहा

दुबईतील बोहो कॅफेत एक लाखांचा गोल्ड करक चहा

मसाला चहावर 24 कॅरेट सोन्याचा मुलामा

चहासोबत सोनेरी पावडर असलेला क्रोसो

चहासोबत चांदीचा कप घरी घेऊन जाण्याची मुभा

1 लाखाचा चहा विकणारा बोहो कॅपेचा मालक सुचेत शर्मा भारतीय

दुबईतील बोहो कॅफे हा आपल्या राजेशाही मेन्यूसाठी जगभर प्रसिद्ध आहे. या ठिकाणी केवळ सोन्याचा चहाच मिळत नाही तर सोन्याचा वर्क असलेला बर्गर, सोन्याचं पाणी, सोन्याची कॉफी असं सगळंच दुबईतील शेखांच्या श्रीमंतीला मॅच होईल असं सोन्याचं मिळतंय. हा चहा बजेट फ्रेण्डली ठेवण्यासाठी या चहावर चक्क ईएमआयची ऑफरही देण्यात आलीये. त्यामुळे आता दुबईला गेल्यानंतर बुर्ज खलिफा पाहण्यासोबत हा सोन्याचा चहा पिण्यासाठी नव्हे तर पाहण्यासाठी तरी जायलाच हवं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup : रिंकू-सॅमसन OUT, केएल राहुल-पराग IN, आशिया चषकासाठी भज्जीने निवडला संघ, वाचा

Curd Health Effects: दहीसोबत हे ५ पदार्थ कधीही खाऊ नका

Astrology Tips: ११ मुखी रुद्राक्ष कोणाला घालावे आणि त्याचे आध्यात्मिक फायदे कोणते? वाचा सविस्तर

HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! ४ नियमांत केले मोठे बदल; तुमचा खिसा रिकामा होणार

Maharashtra Live News Update: पालघरच्या पूर्व आणि पश्चिम भागात मुसळधार पावसाला सुरुवात

SCROLL FOR NEXT