OBC leader Vijay Wadettiwar warns the Maharashtra government to cancel the Maratha reservation GR or face a statewide shutdown. saamtv
Video

मराठा आरक्षणाचा GR रद्द करा; नाहीतर मुंबई, पुणे, ठाणे जॅम करू; वडेट्टीवारांचा इशारा

Vijay Wadettiwar : ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्र सरकारला कडक शब्दात इशारा दिलाय. मराठा आरक्षणाचा जीआर तात्काळ रद्द करण्याची मागणी त्यांनी केलीय. जर जीआर रद्द झाला नाही तर मुंबई, पुणे आणि ठाणे ठप्प करून असं वडेट्टीवार म्हणालेत.

Bharat Jadhav

मराठा समाजाला कुणीबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर त्वरीत रद्द करा,आता ओबीसी हटणार नाही. जीआर मागे घेतला नाही तर मुंबई, ठाणेसह पुणे जॅम करू असा इशारा ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला दिलाय. राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. सरकारने काढलेल्या जीआरविरोधात ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. आज नागपुरात ओबीसी समाजाकडून मोर्चा काढण्यात आला. यावेळी काँग्रेस नेते आणि ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला गंभीर इशारा दिला.

सरकारनं जीआर काढून ओबीसीवर सुरी चालवलीय. तुम्ही जशी मुंबई जॅम केली तशी आणि मुंबईसह ठाणे, पुणे जॅम करू. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षणात घुसखोरी केली जातेय. ओबीसीच्या मानेवर सुरी चालवण्याचे काम सरकारनं केलंय. ३७४ जातींनी तुम्हाला खुर्चीवर बसवलं त्यांच्यावरच अन्याय करण्याची हिंमत कशी झाली असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी सरकारला केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाला मंजूरी तर मिळाली, पण कधीपासून लागू होणार? संभाव्य तारीख वाचा

Election News : राज्यात तीन टप्प्यांत निवडणुका? पुढील आठवड्यात बिगुल वाजणार ? | VIDEO

Airtel Cheapest Plan: घरात Wifi आहे? मग 'हा' एअरटेल प्लॅन तुमच्यासाठी आहे सर्वोत्तम, जाणून घ्या फायदे

Maharashtra Live News Update : मुंबईतील आझाद मैदानमध्ये मविआचे आंदोलन

Election : इच्छुक उमेदवारांना झटका, आयोगाने घेतला मोठा निर्णय, निवडणुकीत उतरण्याआधी हे वाचाच...

SCROLL FOR NEXT