Non-Marathi traders in Borivali participate in MNS-led ‘Marathi Classroom’ initiative, learning the basics of the Marathi language. Saam Tv
Video

ठाकरेंच्या डरकाळीनंतर अमराठी व्यापाऱ्यांची मराठी शिकण्यास सुरूवात | VIDEO

MNS launches Marathi language school in Borivali: ठाकरेंच्या डरकाळीनंतर बोरीवलीत अमराठी व्यापाऱ्यांनी मनसेच्या 'मराठीची पाठशाळा' उपक्रमात सहभाग घेतला आहे. मराठी शिकण्याचा हा प्रयत्न सध्या मुंबईत नव्या सामाजिक बदलाची नांदी ठरत आहे.

Omkar Sonawane

मुंबईत सुरू असलेल्या भाषा वादाच्या पार्श्वभूमीवर, आता ठाकरेंच्या डरकाळीनंतर अमराठी व्यापाऱ्यांनी मराठी शिकण्यास सुरुवात केलीय. बोरीवलीत मनसेकडून 'मराठीची पाठशाळा' हा उपक्रम राबवण्यात आला. यात अनेक अमराठी व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत मनसे कार्यकर्त्यांसोबत बसून मराठी बाराखडी शिकण्याचा प्रयत्न केला. मुंबईत मराठीच्या पुनरुज्जीवनासाठीचा हा प्रयत्न प्रभावशाली होताना दिसतोय.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठी आणि अमराठी वाद सुरू आहे. याच मुद्यावरून मनसे कार्यकर्त्यांनी एका व्यापाऱ्याला मीरा भाईंदरमध्ये चोप दिला होता. यानंतर तेथील अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता. त्यालाच प्रत्युत्तर देत मनसे कार्यकर्त्यांनी दोन दिवसापूर्वी मराठी नागरिकांना घेऊन मोर्चा काढला होता. याच पार्श्वभूमीवर बोरीवलीमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी मराठी पाठशाळा सुरू केली आहे. यामध्ये तेथील व्यापऱ्यांना मराठी शिकवण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सिगारेट, पैशांच्या बॅगा आणि मंत्री शिरसाट; संजय राऊतांचा व्हिडीओ पोस्ट करत मोठा गौप्यस्फोट

मराठी-हिंदी वादात ब्रिजभूषण सिंहांची उडी,ठाकरेंना थेट धमकी

गौरवास्पद! UNESCO च्या यादीत पुण्यातील तीन किल्ल्यांचा समावेश | VIDEO

Government Scheme : मुलांसाठी सरकारची नवी योजना? मुलांना महिन्याला 3 हजार?

Sleeping Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा कोणती?

SCROLL FOR NEXT