Speaker Narwekar restricts Vidhan Bhavan entry after MLA fight saam tv
Video

विधानभवनात यापुढं अभ्यांगतांना नो एन्ट्री; फक्त आमदार, पीए आणि अधिकाऱ्यांनाच प्रवेश | VIDEO

Maharashtra Assembly Fight : महाराष्ट्र विधानसभेच्या लॉबीत पडळकर आणि आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीच्या घटनेनंतर विधानसभाध्यक्षांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे अधिवेशन काळात अभ्यांगतांना प्रवेश नसेल. आमदार, त्याचे अधिकृत पीए आणि शासकीय अधिकाऱ्यांनाच प्रवेश असेल.

Nandkumar Joshi

भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते विधानसभेच्या लॉबीतच भिडले. त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. त्यानंतर विधानभवन परिसरात अभूतपूर्व गोंधळ उडाला. या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी विधानसभा सभागृहात तीव्र पडसाद उमटले. अखेर सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला. यापुढील काळात विधीमंडळ अधिवेशन सुरू असताना अभ्यांगतांना प्रवेशबंदी असेल. तसेच आमदार (सदस्य), त्यांचे स्वीय सहायक (पीए) आणि शासकीय अधिकाऱ्यांनाच विधानभवनात प्रवेश असेल, असं नार्वेकर यांनी सांगितले.

विधानभवनात झालेल्या हाणामारीच्या घटनेनंतर प्रवेशाबाबत निर्णय घेतानाच राहुल नार्वेकर यांनी लोकसभेप्रमाणेच विधानभवनातही नितीमूल्य समितीची स्थापना करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

विधानसभाध्यक्ष काय म्हणाले?

विधानभवन परिसरात अधिवेशन काळात फक्त सदस्य (आमदार), त्यांचे अधिकृत स्वीय सहायक आणि शासकीय अधिकारी यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. अभ्यांगत कोणत्याही कारणास्तव सदस्यांसोबत विधानभवनात आले तर त्यांच्या वर्तवणुकीची संपूर्ण जबाबदारी ही संबंधित सदस्यांनी घेणे आवश्यक आहे. कोणत्याही अभ्यांगताच्या आक्षेपार्ह वर्तवणुकीसाठी सदस्यांवर देखील जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे. आमदारांच्या नैतिक आचरणाचे उच्च मापदंड राखण्यासाठी लोकसभेच्या धर्तीवर नितीमूल्य समिती गठित करण्याचे विचाराधीन आहे. लवकरच सभापतींसोबत विचारविनिमय करून व गटनेत्यांशी संपर्क साधून यासंबंधीचा निर्णय पुढच्या एका आठवड्यात घेण्यात येईल, असंही विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूर-कोल्हापूर महामार्ग बंद, तिऱ्हे पूल पाण्याखाली

Solapur Pune Expressway Closed : सीना नदीच्या प्रवाहात वाढ! सोलापूर- पुणे महामार्ग वाहतूकीसाठी पूर्णपणे बंद | VIDEO

iPhone 16 Cancelled: Flipkart Big Billion Daysमध्ये स्कॅम? iPhone 16 ऑर्डर रद्दीमुळे फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजवर ग्राहकांचा संताप

Crime: ४ बहिणींवर बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट, आरोपीकडून मेहुण्याची हत्या, मृतदेह घराजवळ पुरला

Solapur Flood News : महामार्ग बंद; लालपरीची चाके थांबली, वंदे भारत एक्सप्रेस ठप्प, सोलापूरमध्ये अतिवृष्टीमुळे मेगाहाल

SCROLL FOR NEXT