Nilesh Rane SaamTv
Video

Nilesh Rane : नीलेश राणे शिवसेनेत प्रवेश करणार,VIDEO

Nilesh Rane Joining Shivsena : नीलेश राणे यांनी पत्रकार परिषदेतून भाजपला रामराम ठोकल्याची माहिती दिली आहे. तसेच उद्या ते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.

Saam Tv

भाजप नेते नीलेश राणे यांनी भाजपला आज सोडचिठ्ठी दिली आहे. उद्या ते शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कुडाळमध्ये प्रवेश करणार आहेत. याबाबत त्यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. 'माझा शिवसेनतील प्रवेश निश्चित झाला आहे. हा सर्व विषय नेत्यांनी ठरवलेला आहे,असं त्यांनी यावेळी बोलताना म्हंटलं आहे.

नारायण राणे यांच्या राजकारणाची सुरवात झालेल्या पक्षात मला काम करण्याची संधी मिळत आहे. केवळ कुडाळमधून निवडणूक जिंकण्यासाठी आपण काम करणार आहोत. कुडाळमधून धनुष्यबाणवर निवडणूक लढवणार असे त्यांनी स्पष्ट केले. तर भाजपमध्ये मला शिस्त शिकायला मिळाली. देवेंद्र फडणवीस यांनी मला कायम लहान भावासारखी वागणूक दिली. भाजपमध्ये सर्वच नेत्यांसोबत माझे चांगले संबंध आहेत, ते कायम राहतील. आज जास्त काही बोलण्यासारखे नाही. पण एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात काम करण्याची जी संधी मिळाली त्याचा आनंद आहे. पक्षांने काही हवा काढली नाही. मी शिस्त आणि प्रोटोकॉल पाळणारा माणूस आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT