SSC-HSC Exam Saam tv
Video

HSC-SSC Exam : दहावी-बारावीची परीक्षा देणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय

Maharashtra SSC HSC exam new rules CCTV drone : दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी महाराष्ट्र बोर्डाचा मोठा निर्णय. प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही बंधनकारक, रेकॉर्डिंग ३० दिवस जतन. ड्रोनद्वारे नजर, कलम १४४ लागू आणि सुविधा नसलेल्या केंद्रांची मान्यता रद्द.

Namdeo Kumbhar

Maharashtra HSC SSC exam : दहावी आणि बारावीच्या आगामी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने कॉपीमुक्त अभियानांतर्गत अनेक मोठे आणि महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केले आहेत. या निर्णयानुसार, आता प्रत्येक परीक्षा केंद्रावरील वर्गात सीसीटीव्ही कॅमेरा असणं बंधनकारक करण्यात आलं आहे, आणि याचं रेकॉर्डिंग ३० दिवसांपर्यंत जतन केलं जाईल. ज्या परीक्षा केंद्रांवर कॉपीचे प्रकार घडतील, त्या केंद्रांची मान्यता कायमची रद्द करण्याचा इशाराही मंडळाने दिला आहे. याशिवाय, संवेदनशील केंद्रांवर ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जाणार असून, परीक्षा केंद्राच्या परिसरात कलम १४४ लागू केले जाणार आहे. परीक्षेपूर्वी १५ नोव्हेंबरपासून सर्व केंद्रांची पडताळणी केली जाईल आणि ज्या केंद्रांवर पक्की संरक्षक भिंत व सीसीटीव्हीसारख्या सुविधा नसतील, त्यांची मान्यता रद्द होऊ शकते. पुणे विभागीय बोर्डाचे अध्यक्ष औदुंबर उकीरडे यांनी सांगितले की, 'ज्या केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे, पक्की भिंत, स्वच्छतागृह अशा महत्त्वाच्या सुविधा नाहीत, त्या केंद्राची मान्यता रद्द होईल.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Travel : वीकेंडला वन-डे सहलीचा बेत आखताय? 'हे' आहे मुंबईतील विरंगुळ्याचे सुंदर ठिकाण

Maharashtra Live News Update: धाराशिव बस डेपोमध्ये तीन तास डिझेल नसल्याने एसटी बस सेवा बंद

Maharashtra Politics : काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्यापूर्वी बडा नेता भाजपच्या गळाला

Chanakya Niti: या ४ चूकांमुळे घरात येते गरिबी, हातात पैसा टिकत नाही; चाणक्यांनी सांगितले सत्य

Kolhapur Crime: सासऱ्याला लढायची होती निवडणूक, १० लाख रुपयांसाठी सुनेकडे तगादा; छळाला कंटाळून आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT