neet exam scam newss  Saam tv
Video

आमच्या सिस्टीममधून NEET पेपर फुटला नाही; NTA अधिकाऱ्यांचा अजब पवित्रा

NEET paper leak : NEET पेपरफुटी प्रकरणात NTA ने संसदीय समितीसमोर मोठा दावा केला आहे. “आमच्या सिस्टीममधून पेपर फुटला नाही,” असे सांगत अधिकाऱ्यांनी जबाबदारी नाकारली.

Namdeo Kumbhar

NEET पेपरफुटी प्रकरणावरून सध्या देशभरात गदारोळ सुरू असतानाच, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) संसदीय समितीसमोर एक अजब आणि धक्कादायक पवित्रा घेतला आहे."आमच्या सिस्टीममधून कोणताही पेपर फुटलेला नाही. जोपर्यंत सीबीआय (CBI) या गोष्टीची पुष्टी करत नाही, तोपर्यंत आम्ही हे मान्य करणार नाही," असा पवित्रा 'NTA'च्या अधिकाऱ्यांनी घेतला आहे.

संसदीय समितीसमोर झालेल्या या बैठकीत 'NTA'च्या अधिकाऱ्यांची चांगलीच झाडझडती घेण्यात आली. एनटीएच्या या दाव्यावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेत, "जर पेपर फुटलाच नव्हता, तर मग फेरपरीक्षा का घेण्यात आली?" असा थेट आणि तिखट सवाल उपस्थित केला. या गंभीर प्रश्नावर 'NTA'च्या अधिकाऱ्यांकडून कोणतेही समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे संसदीय समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत'हिट अँड रन'चा थरार! मध्यरात्री टँकरने डिलिव्हरी बॉयला चिरडले

Palghar Tourism : निसर्गाचा मनसोक्त आनंद घ्यायचाय; तर पावसाळ्यात पालघरमधील या ठिकांणाना नक्की भेट द्या

Maharashtra News Live Update: पुण्यातील कोंढवा परिसरात मोठी वाहतूक कोंडी

Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर 2 महिन्यातच खड्डे; व्हिडीओ समोर आल्याने एकच खळबळ

Gold Rate Today: सोन्याची किंमत घसरली! प्रति तोळा सोनं ₹1,46,730 वर; वाचा २४k, २२k, १८k सोन्याचा आजचा भाव

SCROLL FOR NEXT