Rupali Thombre Saam TV Marathi news
Video

Rupali Thombre : चाकणकरांसोबतचा वाद भोवला? रूपाली ठोंबरेंना राष्ट्रवादीचा धक्का, महत्त्वाचं पद घेतले काढून

NCP removes Rupali Thombre from spokesperson list : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी घडामोड; प्रवक्त्यांच्या नव्या यादीत रुपाली ठोंबरे यांचे नाव वगळले. रुपाली चाकणकर यांच्याशी झालेल्या वादानंतर पक्षाने घेतला मोठा निर्णय. आगामी निवडणुकांपूर्वी पक्षात गटबाजी उफाळली.

Namdeo Kumbhar

Ajit Pawar NCP drops Rupali Thombre from party spokesperson post राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी घडामोड समोर आली आहे, पक्षाने नव्या प्रवक्त्यांची यादी जाहीर केली असून यात नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांचे नाव वगळण्यात आले आहे. रुपाली ठोंबरे यांनी पक्षाच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर केलेल्या टीकेमुळे ही कारवाई झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. एका व्हायरल व्हिडिओ प्रकरणावरून दोघींमधील वाद विकोपाला गेला होता, ज्यानंतर ठोंबरे यांनी चाकणकरांवर जाहीरपणे गंभीर आरोप केले होते. 'मला पक्षाची नोटीस नाही तर खुलासा पत्र आले आहे, आणि मी त्यावर कायदेशीर उत्तर देईन,' असे रुपाली ठोंबरे यांनी म्हटले होतं. या नव्या यादीत अनिल पाटील, आनंद परांजपे यांच्यासारख्या नेत्यांची नावे कायम आहेत. मात्र, ठोंबरे यांचे नाव वगळल्यामुळे पक्षांतर्गत गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घटनेचे मोठे राजकीय परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मी आज पुण्याच्या बाहेर आहे. प्रवासात असल्याने माझा संपर्क होऊ शकला नाही. आज पक्षाने नव्याने प्रवक्त्याची नेमणूक केली आहे. त्यात माझ्यासह आमदार अमोल भाऊ मिटकरी, वैशालीताई नागवडे यांची नावे नाहीत. आम्ही येऊ घातलेल्या निवडणुकांना सामोरे जाणार सज्ज आहोत. पक्षाचे काम जोमाने करणार आहोत. या यादी बद्दल अजितदादाना भेटून बोलून या विषयी माहिती घेईल मग आपल्या सर्वांशी सविस्तर बोलेल, असे ठोंबरे म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाण्यामध्ये खड्डयांमुळे होणाऱ्या अपघातांची शहानिशा करण्यासाठी समितीची स्थापना

Horoscope: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ती राशींना लागणार लॉटरी, प्रगतीसह घरात येणार पैसाच पैसा

Haldi Jewellery For Bride: कमी पैशात घ्या नवरीसाठी हळदीचे दागिने, या आहेत एकापेक्षा फुलांच्या डिझाईन्स

Radhika Apte: 'माझी प्रेग्नेंसी धक्कादायक होती', 'ही' मराठमोळी अभिनेत्री प्रेग्नेट होण्यासाठी नव्हती तयार

मोठी बातमी! क्रिडामंत्री माणिकराव कोकाटेंच्या अडचणीत वाढ, अटकेची टांगती तलवार, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT