Supriya Sule PC SaamTv
Video

Supriya Sule News : सत्तेतल्या लोकांकडून धमक्या दिल्या जाताय; टिंगरेंच्या नोटीसवर सुप्रिया सुळेंची टीका

Supriya Sule Press On Sunil Tingre Notice : खासदार सुप्रिया सुळे यांनी आज आमदार सुनील टिंगरे यांनी शदर पवारांना पाठवलेली नोटीस मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सर्वांना दाखवली आहे.

Saam Tv

सध्या राजकारणात सत्तेत असलेल्या लोकांकडून धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. रविवारी आयोजित पत्रकार परिषदेतून त्यांनी हा आरोप करत वडगाव शेरीचे आमदार सुनील अण्णा टिंगरे यांनी शदर पवारांना पाठवलेली नोटीस सर्वांसमोर दाखवली आहे.

पोर्शे कार अपघात प्रकरणी आमदार सुनील टिंगरे यांनी शरद पवार यांनी नोटीस पाठवली आहे, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला होता. त्यावर टिंगरे यांनी मी अशी कोणतीही नोटीस पाठवली नाही. सुप्रिया ताई सहानुभूतीसाठी खोट बोलून खटाटोप करत असल्याचं त्यांनी काल म्हंटल्यानंतर आज सुप्रिया सुळे यांनी सुनिल टिंगरेंनी शरद पवारांना पाठवलेली नोटीस सर्वांना दाखवली आहे.

दरम्यान, यावेळी सुप्रिया सुळे यांनी धनंजय महाडिक यांच्या विधानावरही प्रतिक्रिया दिली आहे. महाडीक यांनी केलेल्या विधानाचा मी निषेध करते. महाराष्ट्रातील महिलांना धमकी देण्याची हिंमत होतेच कशी? महिलांना अशा प्रकारच्या धमक्या देणे खपवून घेणार नाही. भाजप स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही. जर राजकीय सुडापोटी त्या महिलांचा शासकीय निधी बंद केला, तर गाठ आमच्याशी आहे, असा इशाराच सुळे यांनी भाजपला दिला आहे.

Edited By Rakhi Rajput

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : गौतम अदानींना विरोध म्हणजे देशाला आणि महाराष्ट्राला विरोध - नितीश राणे

Maharashtra Politics : "आम्हाला वेगळा न्याय का? राणा दांपत्याची भाजपमधून हकालपट्टी करा"

PM Modi In Mumbai: पंतप्रधान मोदींच्या प्रचार सभेसाठी खारघरमधील वाहतुक मार्गांमध्ये मोठे बदल, 'या' ठिकाणी नो पार्किंग झोन

Government Job: चौथी आणि दहावी पास तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, कोचिन शिपयार्डमध्ये जॉब; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: अचानक वेगाने गेंडा आला रस्त्यावर, लोकांना पळता येईना, पुढे जे घडलं ते पाहा

SCROLL FOR NEXT