Sharad Pawar  Saam tv
Video

Sharad Pawar: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुबी हॉल क्लिनिकमधून डिस्चार्ज

Sharad Pawar Discharged from Ruby Hall Clinic: राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. चार दिवसांच्या उपचारानंतर आज ते पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधून त्यांना घरी सोडण्यात आले.

Priya More

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर आणि उपचार पूर्ण झाल्यानंतर शरद पवार यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधून घरी सोडण्यात आले. छातीत इन्फेक्शन झाल्यामुळे आणि अस्वस्थ वाटत असल्यामुळे २२ फेब्रुवारीला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चार दिवसांच्या विश्रांतीनंतर आज शरद पवारांना डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून बाहेर पडतानाचे त्यांचे व्हिडीओ समोर आले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी प्रतिभा पवार आणि मित्र विठ्ठल मणियार होते. शरद पवार यांचे जवळचे मित्र विठ्ठल मणियार यांनी सांगितले की, 'पवारसाहेब यांची प्रकृती उत्तम असून त्यांनी सर्व डॉक्टरांचे आभार मानले. सर्व डॉक्टरांनी त्यांची काळजी घेतली त्यामुळे घरी जाताना त्यांनी सर्वांना अभिवादन केलं. साहेब बरे झाले की लगेच कामाला लागतात. काम आणि माणसं त्यांची विल पावर आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT