NCP workers celebrate ‘Kali Diwali’ holding black lamps and balloons to protest delay in farmer relief at Dharashiv Collector Office. Saam Tv
Video

NCP Protest: हातात काळा दिवा, फुगे सोडत राष्ट्रवादीकडून शेतकऱ्यांसाठी काळी दिवाळी आंदोलन|VIDEO

Black Diwali Celebration By NCP: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी अद्याप मदत न मिळाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी दिवाळी साजरी केली.

Omkar Sonawane

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांना सोबत घेत काळी दिवाळी साजरी करण्यात आली. अतिवृष्टीने धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दिवाळीपूर्वी मोठे पॅकेजची घोषणा केली.

पण दिवाळी एक दिवसावर आली असली तरी अद्याप पर्यंत कुठलीच मदत शेतकऱ्यांना मिळाली नसल्याने ही दिवाळी काळी दिवाळी असून ही जिल्हा प्रशासनाच्या समोरच आम्ही साजरी करत असल्याचे सांगत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गेटवरच हे आंदोलन केले. हातात फलक, काळा आकाशी दिवा आणि काळे फुगे सोडत घोषणाबाजी करत त्यांनी ही काळी दिवाळी साजरी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT