Javed Pathan NCP candidate death Saam TV Marathi News
Video

Municipal Election : दुर्दैवी! अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा मृत्यू, अर्ज दाखल करून ऑफिस बाहेर आले अन्....

NCP Ajit Pawar faction candidate dies during municipal elections : मिरा–भाईंदर महापालिका निवडणुकीदरम्यान दुर्दैवी घटना घडली. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जावेद पठाण यांनी अर्ज दाखल केल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

Namdeo Kumbhar

Javed Pathan death after filing nomination Mira Bhayander : मिरा–भाईंदर महापालिका निवडणुकीदरम्यान एक अत्यंत दुर्दैवी घटना घडलीये... उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय... जावेद पठाण असं मृत उमेदवाराचं नाव आहे. त्यांनी सकाळी प्रभाग क्रमांक 22 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. (Mira Bhayander civic election tragic incident)

मिळालेल्या माहितीनुसार, जावेद पठाण यांनी सकाळी १० ते ११ या वेळेत प्रभाग क्रमांक २२ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर दुपारी सुमारे साडेतीन वाजण्याच्या सुमारास मिरा रोड येथील हैदरी चौक परिसरात त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. तत्काळ उपचारासाठी प्रयत्न करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे मिरा–भाईंदरच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली असून, निवडणुकीच्या रणधुमाळीत हा प्रकार घडल्याने सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: प्रमोद नाना भानगिरे एकनाथ शिंदे फाऊंडेशनतून २ विद्यार्थ्यांचा दहावीपर्यंत सगळा खर्च करणार

Vidyanand Bapat: ‘बघणाऱ्यांच्या बुद्धीची कीव येते’; दहीहंडीतील AI व्हिडिओवर विद्यानंद बापटांचा पलटवार

Bike Tips : नवी बाईक घेतलीय? दुचाकीची सर्व्हिसिंग करताना या अजिबात करू नका! अन्यथा...

मुंबईच्या दहीहंडीत थेट मोदींची एन्ट्री; पाहा VIDEO

लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर! वर्षाला 3 सिलिंडरसाठी मिळणार 3,000, अर्ज कसा कराल?

SCROLL FOR NEXT