Ajit Pawar News SaamTv
Video

VIDEO : 'विनाशकाली विपरीत बुद्धी', सदभाऊ खोत यांच्या 'त्या' टीकेवर अजित पवारांचं मोठं विधान | Marathi News

Ajit Pawar On Sadabhau Khot Statement : महायुतीचे नेते सदाभाऊ खोत यांनी खासदार शरद पवार यांच्यावर केलेल्या टिकेनंतर अजित पवार यांनी याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Saam Tv

मी तीव्र शब्दात त्याचा निषेध केला आहे, त्याच ट्विट ही केलं आहे, त्यांना फोन केला तुम्ही केलेले हे स्टेटमेंट आम्हाला कुणालाही आवडले नाही, तुम्ही हे बंद करा. वैयक्तिक कुणाच्या विषयी बोलणं आपली पद्धत नाही, त्याबद्दल मी निषेध केलेला आहे. पवार साहेबांबद्दल अशी टीका कधीच सहन केली जाणार नाही, असं विधान अजित पवार यांनी केलं आहे. सदभाऊ खोत यांनी केलेल्या विधानावर त्यांनी नाराजी व्यक्त करत हे विधान केलं आहे.

महायुतीचे नेते सदाभाऊ खोत यांनी खासदार शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. त्यानंतर आता सगळ्या स्तरांतून त्यांच्यावर टीका केली जात आहे. सदभाऊ खोट यांच्या वक्तव्यावर बोलताना अजित पवार यांनी देखील या गोष्टीचा निषेध व्यक्त करत शरद पवार यांच्यावर अशी टीका सहन केली जाणार नाही असं म्हंटलं आहे. 'पवार साहेबांबद्दल असं वक्तव्य करता कामा नये. तुम्हाला जी भूमिका मांडायची आहे ती मांडा, तुमची विचारधारा आणि इतरांची विचारधारा वेगळ्या असू शकतात. मतमतांतर असू शकतो ताळमेळ ठेवून बोललं पाहिजे. हा विनाशकाली विपरीत बुद्धीसारखा निंदनीय प्रकार आहे. असं पुढे होणार नाही असं त्यांनी सांगितलं आहे. अशा पद्धतीची वक्तव्य महाराष्ट्र सहन करत नाही आम्हालाही ते मान्य नाही', अशा शब्दांत अजित पवार यांनी देखील सदभाऊ खोत यांच्यावर टीका केली आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Govindwadi Bypass Bridge : ६ वर्षांतच पुलाची दैना; कल्याणच्या गोविंदवाडी बायपास पुलाच्या कोट्यवधींच्या कामावर प्रश्नचिन्ह

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Pink Saree: नवविवाहीत स्त्रीयांनी श्रावणात सणासुदींसाठी नेसा 'ही' सुंदर गुलाबी साडी

SCROLL FOR NEXT