अभिजित देशमुख
कल्याण : कल्याण शहराच्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून तब्बल ३ कोटी ५० लाख रुपये खर्चून २०१९ साली गोविंदवाडी बायपास मार्गावरील नाल्यावर पूल उभारण्यात आला होता. मात्र या पुलाची केवळ सहा वर्षांतच दैना झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. पुलाच्या कॉन्क्रीटला जागोजागी तडे पडले व खपल्या उडाल्या आहेत. तसेच सळ्या देखील उघड्या पडल्याने या पुलाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
कल्याण शहरात होत असलेल्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून गोविंदवाडी बायपास मार्गावर उड्डाणपूल साकारण्यात आला आहे. दरम्यान रस्ते विकास महामंडळाने २०१९ मध्ये हा पूल ३ कोटी ५० लाख खर्चून १७ गर्डरच्या साहाय्याने २३ मीटर रुंद आणि ३५ मीटर लांब प्री-कास्ट पद्धतीने पूल उभारला होता. या पूल उभारणीला सहा वर्ष झाले असतानाच सिमेंट काँक्रेटच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे.
खड्ड्यातून मार्ग काढताना दमछाक
दरम्यान गोविंदवाडी बायपासवरून दररोज नवी मुंबई ते भिवंडी– नाशिक मार्गावर जाणाऱ्या अवजड वाहनांची प्रचंड वर्दळ असते. बऱ्याचदा पण दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्यात मोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळतं. अशा खड्ड्यांतून वाट काढताना वाहन चालकांची आणि दुचाकीस्वारांची दमछाक होते. अनेकदा खड्ड्यातून मार्ग काढताना अपघात देखील होतात.
देखभाल दुरुस्तीची जबाबदारी केडीएमसीची
रस्ते विकास महामंडळने जबाबदारी झटकत रस्ता दोन वर्षांपूर्वी महापालिकेकडे वर्ग केला असून देखभाल दुरुस्ती जबाबदारी ही कल्याण- डोंबिवली महापालिकेची असल्याचे सांगितले. तर याबाबत पालिकेचे कार्यकारी अभियंता जगदीश कोरे यांना विचारले असता दरम्यान या पुलाचा ऑडीट अहवाल देण्याबाबत रस्ते विकास महामंडळाला कळविण्यात आले आहे. पुन्हा एकदा या पुलाची पाहणी करून प्रशासनाकडून याबाबतचा निर्णय घेतला जाईल असे सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.