Navneet Rana addressing students in Amravati, questioning Thackeray brothers over Marathi-Hindi language divide Saam Tv
Video

मराठीसोबत हिंदीचाही सन्मान, भाषेवरून नवनीत राणांनी राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना डिवचले|VIDEO

Navneet Rana accuses Uddhav and Raj Thackeray: भाजप नेत्या नवनीत राणा यांनी अमरावतीत मराठी आणि हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंवर घणाघाती टीका केली. "तुमची मुलं मराठी शाळेत शिकली का?" असा सवाल करत राजकीय स्वार्थासाठी तेढ निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

Omkar Sonawane

मला शेवटच्या श्वासापर्यंत मराठीचा अभिमान राहील कारण मी या महाराष्ट्रात जन्माला आली, ज्या राज्यात तुम्ही राहतात ती भाषा सगळ्यात पहिली असते. माझी जन्मभूमी व कर्मभूमीची भाषा मराठी असल्याने मी तिला समोर ठेवणार आहे. पण ज्या हिंदुस्तानमध्ये मी राहते त्या हिंदी भाषेला सुद्धा दुसऱ्या क्रमांकावर आम्ही त्या भाषेचा सन्मान करतो. पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे स्वतःची राजकीय पोळी शेकण्याकरिता देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतात. मराठी आणि हिंदी भाषेत तेढ निर्माण करण्याचं काम करतात.

त्यांनी हे सांगा की तुमचे मुलं मराठी शाळेत शिकले की हिंदी भाषेत शिकले? असा सवाल भाजप नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीमध्ये आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभामध्ये ठाकरे बंधूंना केला. तर बरेच नेते हे हिंदी आणि मराठी भाषेमध्ये वाद घालून महापालिकेची पोळी शिकण्याचा प्रयत्न करत आहे. कंधो से उचित छाती नही होती, धर्म से बडी कोई जाती नही होती, दीपक ही नही बचा तो बाकी का क्या करोगे? अगर धर्म ही नही बचा तो जाती का क्या करोगे त्यामुळे हिंदुस्थानात माझ्यासाठी धर्म आहे, कर्म आहे पूजा आहे, यामध्ये हिंदूंचं विभाजन करू नका, असे वक्तव्य नवणीत राणा यांनी यावेळी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: सून बाथरूममध्ये गेली, सासरा आधी एकटक पाहत बसला; नंतर आत शिरला अन्...

Police Officers Transfer : राज्यात बदल्यांचा धडाका सुरु! बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Maharashtra Live News Update: काँग्रेस नेते अतुल लोंढे यांना धमकीचा कॉल

Skin Care Tips: मेकअपशिवाय ग्लोइंग स्कीन हवीये, मग 'या' ५ गोष्टी नक्की कराच

Mumbai Bomb Threat: स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला धमकीचा कॉल; रेल्वेगाडी बॉम्बने उडवून टाकू!

SCROLL FOR NEXT