State Cabinet approves naming of Navi Mumbai Airport after D.B. Patil in a unanimous historic decision. Saam Tv
Video

नवी मुंबई विमानतळाचे नामकरण ‘दि.बा. पाटील’ यांच्या नावावर शिक्का मोर्तब|VIDEO

Historic Decision: नवी मुंबई विमानतळाचे नामकरण दि.बा. पाटील यांच्या नावावर करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या निर्णयानुसार, केंद्र सरकारकडे एकमेव नाव पाठवण्यात आले आहे.

Omkar Sonawane

नवी मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यस्तरीय बैठक घेण्यात आली, ज्यात नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांच्या नावावर नामकरण करण्याचा निर्णय शिक्कामोर्तब झाला. बैठकीत सर्वपक्षीय नेते उपस्थित होते आणि या प्रस्तावावर एकमताने पाठिंबा दर्शविला.

राज्य सरकारने याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला असून, ‘दि.बा. पाटील’ हे नाव एकमेव म्हणून केंद्राला सादर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकनंतर सांगितले की, येत्या तीन महिन्यांत या नावाची अधिकृत घोषणा केली जाईल. हि घोषणा दि.बा. पाटील यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सार्वजनिक कार्यातील योगदानाला अभिवादन असून, त्यांच्या स्मरणार्थ विमानतळाच्या या नामकरणामुळे त्यांचा वारसा कायम राहील असे मुख्यमंत्री म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Matar 5 Dishes : हिवाळ्यात आवर्जून बनवा मटारच्या या ५ डिशेस

Mumbai Travel : नवीन वर्षात ट्रेकिंगसाठी खास लोकेशन, मुंबईपासून जवळ आहे 'हे' ऐतिहासिक ठिकाण

Dusky Skin Makeup Tips: सावळ्या रंगाच्या त्वचेवर अशा पद्धतीने करा मेकअप; चेहऱ्यावर दिसेल नॅचरल ग्लो

Ladki Bahin : "आम्हालाच मत द्या, नाहीतर 'लाडकी बहीण'चे ₹१५०० बंद करू, भाजप नेत्यांकडून ब्लॅकमेल"

Maharashtra Live News Update: अमरावती शहरात मतदारसंख्येत मोठी वाढ

SCROLL FOR NEXT