Police investigate the tragic suicide of a Navi Mumbai student allegedly humiliated by a teacher during exams. Saam Tv
Video

कॉपी केल्याचा आरोप, शिक्षिकेने अपमानित केलं आणि विद्यार्थिनीने उचललं टोकाचे पाऊल; नवी मुंबईत खळबळ|VIDEO

Navi Mumbai Airoli Student: नवी मुंबईत ऐरोली परिसरातील एका दहावीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली. तिच्या पालकांच्या आरोपानुसार, मुख्याध्यापिका देशमुख मॅडम यांनी परीक्षेदरम्यान कॉपीचा आरोप लावून सार्वजनिकरित्या अपमान केले.

Omkar Sonawane

नवी मुंबई: ऐरोली परिसरात राहणाऱ्या दहावीत शिकणाऱ्या अनुष्का शहाजी केवळे हिने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तिच्या कुटुंबियांच्या आरोपानुसार, सुशिलाबाई देशमुख विद्यालयाच्या मुख्याध्यापिका देशमुख मॅडम यांनी परीक्षेच्या दरम्यान तिचा अपमान केला. परीक्षेच्या वेळी अनुष्काच्या बेंचखाली एक कॉपी सापडली. यावरून पेपरसाठी ती कॉपीचा वापर करत असल्याचा आरोप केला गेला.

यामुळे देशमुख मॅडम यांनी अनुष्काला सर्वांसमोर अपशब्द वापरून अपमानित केले. या अपमानामुळे अनुष्काला मानसिक त्रास झाला आणि तिने आत्महत्या केली, असे पालकांनी सांगितले. या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात मुख्याध्यापिका देशमुख मॅडम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gautami Patil: गौतमी पाटीलला अटक होणार? कार अपघातापूर्वीचा सीसीटीव्ही समोर

Ro-Ro Service: 200 प्रवासी आणि 75 वाहनं असलेली रो रो बोट अडकली; विरारच्या समुद्रातील थरार

Mumbai : मुंबईकरांसाठी खूशखबर! वाहतूक कोंडीतून सुटका होणार; महत्वाच्या महामार्गाबाबत घेतला मोठा निर्णय

Fire Incident : चालत्या कारला भीषण आग, सीएनजी गळतीमुळे भडका उडाला; चालकाचा होरपळून मृत्यू

Gold Coins Found: समुद्रात सापडला खजिना, सोनं, चांदीच्या नाण्यांचा पेटारा

SCROLL FOR NEXT