Explosives act case filed after huge gelatin seizure in Nashik : नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई करत अंदाजे २२०० डेटोनेटर कांड्या जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे शहरात सुरक्षा वाढविण्यात आली असून, सणासुदीच्या काळात संभाव्य दुर्घटनांना प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
नाशिकच्या वाडीवऱ्हे परिसरातील सारूळ गावाच्या शिवारातील एका पत्र्याच्या शेडमध्ये अवैधरीत्या जिलेटीन स्फोटकांचा इलेक्ट्रिक डेटोनेटरसह मोठा अवैधसाठा ग्रामीण पोलिसांनी धाड टाकून जप्त केलाय. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. या धाडीत अमोनियम नायट्रेटयुक्त असलेल्या जिलेटीनच्या कांड्यांनी भरलेले ४९ खोके, त्यातील एकूण ६,१२५ जिलेटीनच्या कांड्या, २२०० डेटोनेटर, १५० मीटर डी.एफ. वायर असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. सारुळ शिवारात असलेल्या दगडखाणींमध्ये खाणकामासाठी जिलेटीनचा स्फोट घडवून आणला जातो. यासाठी सिन्नर येथील एका कंपनीकडे त्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तिथून जिलेटीन स्फोटके पुरविली जातात. ही स्फोटके खाणकामाच्या ठिकाणी निष्काळजीपणे साठवणूक करण्याची कुठलीही परवानगी संबंधित खाणमालक चालकांना देण्यात आलेली नाही. त्याबाबत त्यांच्याकडे परवानासुद्धा नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जिलेटीनसह इलेक्ट्रिक डेटोनेटरचा साठा करून सुरक्षिततेला धोका निर्माण करणारे कृत्य केल्याप्रकरणी पोलिस अधीक्षक यांच्या आदेशान्वये पथकाने हा छापा टाकला. संशयित सात जणांविरुद्ध वाडीव-हे पोलिस ठाण्यात भारतीय स्फोटक कायद्याचे उल्लंघन क
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.