आगामी कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी नाशिकचं पालकमंत्रिपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत:कडेच ठेवणार असल्याचं समजत आहे. तर गिरीश महाजन यांच्याकडे कुंभमेळा मंत्रिपद देण्यात येणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.
प्रयागराजप्रमाणे नाशिकमध्ये कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारावं हा भाजपचा आग्रह आहे असं सुद्धा बोललं जात आहे. नाशिकच्या पालकमंत्रिपदावर महायुतीच्या तिन्ही पक्षांनी दावा केला आहे. त्यामुळे पालकमंत्रिपदाचा तिढा हा अद्यापही सुटलेला नाही. त्यातच आता फडणवीस नाशिकचं पालकमंत्रिपद स्वत:कडेच ठेवणार असून गिरीश महाजन यांना कुंभमेळा मंत्रिपद देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या प्रयागराजमध्ये कुंभमेळा सुरू आहे. तर २०२७मध्ये नाशिकला कुंभमेळा होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर पालकमंत्रिपदासाठी भाजपची भूमिका बघणं महत्वाचं ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.