Nashik Politics Saam Tv
Video

Nashik Politics: गणेश गीतेंची माघार, पण गोकुळ गीते निवडणूक लढवण्यावर ठाम; दरांडेंनी शिवीगाळ करत बाप काढल्याचा आरोप

Nashik MLC Poll Drama: नाशिक विधानपरिषद निवडणुकीदरम्यान नाट्यमय घडामोडी घडत आहेत. गणेश गीते यांनी निवडणुकीतून माघार घेतली. पण गोकुळ गीते निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यामुळे महायुतीचे टेन्शन वाढलं.

Priya More

नाशिक विधानपरिषद निवडणुकीत मोठी घडामोड घडली असून गणेश गीते यांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यांच्या माघारीमुळे राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे. गणेश गीतेंनी माघारी घेतली असली तरी त्यांचे बंधू गोकुळ गीते हे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. शिंदेसेनेचे उमेदवार नरेंद्र दरांडेनी गोकुळ गीते यांनी फोनवरून शिवीगाळ करत बाप काढला. त्यामुळे गोकुळ गीते संतप्त झाले आहेत. 'माझा बाप काढला जातोय त्यामुळे मी निवडणुकीतून माघार घेणार नाही.', असे गोकुळ गीते यांनी सांगितले. अर्ज माघारी घेण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले असताना नाशिकमध्ये विधान परिषद निवडणुकीतील सस्पेन्स कायम आहे.

अर्ज माघार घेण्यासाठी शेवटचा एक तास उरला आहे. गीते बंधूपैकी एकाने निवडणुकीतून माघार घेतली. पण गोकुळ गीते निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचे टेन्शन वाढले आहे. मंत्री दादा भुसेंसह शिंदे शिवसेनेचे इतर नेते नाशिकमध्ये तळ ठोकून बसले आहेत. नाशिकमुळे जळगावचेही वातावरण तापले आहे. जळगावमध्ये शिंदेसेनेच्या रेश्मा काळे या देखील नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. शिंदेसेनेच्या नेत्यांच्या भेटीनंतर गणेश गीते गिरीश महाजनांचे निकटवर्तीय निलेश बोरा यांच्या घरी पोहचले होते. गणेश गीते यांना अर्ज माघारी घेण्यासाठी वरिष्ठांचा फोन आला होता. या फोननंतर त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Chikoo Benefits: डायबिटीज असलेली व्यक्ती चिकू खाऊ शकते का? जाणून घ्या

Cyclone Arnab: चक्रीवादळ अर्नब येणार? 3 राज्यांत वर्षातील पहिल्या वादळाचा धोका, मुसळधार पावसाचा अलर्ट!

Knee Pain: मांडी घालून बसल्यावर उठताना नेहमी गुडघे दुखतात? दुर्लक्ष करू नका, असू शकते ‘या’ आजारांचे लक्षण

घराबाहेर पडताना खिशात ठेवा 'हा' १ पदार्थ, पाकीट कायम पैशांनी भरलेले राहील

SCROLL FOR NEXT