Devendra Fadnavis Saam Tv
Video

Devendra Fadnavis: नाशिकला ११ नवीन उड्डाणपूल; प्रयागराजच्या धर्तीवर होणार कुंभमेळा, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा, VIDEO

Nashik Development: देवेंद्र फडणवीस हे आज नाशिक दौऱ्यावर आहे यावेळी त्यांनी नाशिकमध्ये 2027 ला होणाऱ्या कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्वाच्या घोषणा केल्या.

Omkar Sonawane

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिकच्या दौऱ्यावर असून, काल रात्री ते नाशिकमध्ये दाखल झाले. त्यांनी शासकीय विश्रामगृहावर मुक्काम केला आणि आज सकाळी त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तसेच कुशावर्त तीर्थाची पाहणी केली.

मुख्यमंत्र्यांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे 2017 साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेतला. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी त्र्यंबकेश्वरच्या विकास आराखड्याबाबत माहिती दिली.

कुंभमेळ्यासाठी विकास आराखडा

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, त्र्यंबकेश्वरचा विकास आराखडा तयार केला असून, कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. देशभरातील लाखो भाविक येथे येत असतात. त्यामुळे सोयीसुविधा सुधारण्यासाठी काही महत्त्वाची कामे हाती घेतली आहेत.

या कामांमध्ये पुढील बाबींचा समावेश आहे,

कॉरिडॉर तयार करणे

पर्यटन व भाविकांसाठी पार्किंग आणि शौचालयांची व्यवस्था

मंदिर आणि कुंडांचे संवर्धन व दुरुस्ती

शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी एसटीपी (सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प) जाळे उभारणे

मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आधी सर्व कामे पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

ते पुढे म्हणाले, या प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार असला तरी राज्य सरकार निधीची कमतरता भासू देणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठामपणे सांगितले. त्यांनी त्र्यंबकेश्वरच्या विकासासाठी 1,100 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आल्याचेही जाहीर केले.

नाशिकच्या विकासासाठी महत्त्वाचे प्रकल्प

मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिकच्या सर्व विकासकामांना मान्यता दिल्याचे सांगितले. विशेषतः शहरात नवीन 11 पूल बांधण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

या विकासकामांमुळे नाशिकचा चेहरा-मोहरा बदलणार असल्याची आशा नाशिककरांनी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Leopard : पुण्यानगर नगरमध्येही बिबट्याचा हल्ला, ४ वर्षाच्या चिमुकलीचा घेतला बळी

Maharashtra Live News Update: एसटी महामंडळ विकणार पेट्रोल

Bihar Elections : बिहारमध्ये १२१ जागांसाठी आज मतदान, तेजस्वी-सम्राट यांच्यात थेट सामना, तर भाऊ तेज प्रतापची स्वतंत्र लढत

RBI नं विकलं 35 टन सोनं? 60 हजार कोटींचं काय केलं?

Pune : पुणे जिल्ह्यात नरभक्षक झाले बिबटे, नागरिकांमधील दहशत कधी संपणार?

SCROLL FOR NEXT