Ashok Kharat Saam Tv
Video

Ashok Kharat: भोंदू अशोक खरातची प्रकृती बिघडली, SIT चौकशीदरम्यान छातीत दुखू लागलं; नंतर रुग्णवाहिका बोलावली

Ashok Kharat Health Update: भोंदू अशोक खरातची प्रकृती बिघडली होती. चौकशीदरम्यान अचानक छातीत दुखू लागल्याची तक्रार खरातने केली होती. त्यानंतर रुग्णवाहिका बोलावून त्याच्यावर तिथेच उपचार करण्यात आले.

Priya More

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात महत्वाची माहिती समोर आली आहे. एसआयटी चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती अचानक बिघडली. तातडीने कार्डियाक ॲम्बुलन्स मागवून भोंदू खरातची तपासणी करण्यात आली आहे. अशोक खरातला डोकेदुखी , मळमळ आणि उलटीचा त्रास होत असल्याची माहिती समोर आली आहे. छातीत दुखत असल्याने काही काळ त्याला ऑक्सिजन लावण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वी अशोक खरातच्या वकिलांनी त्याला न्यूरोसर्जनकडे घेऊन जाण्याची मागणी न्यायालयात केली होती.

दरम्यान, भोंदू अशोक खरात प्रकरणात एसआयटीकडून वेगाने तपास सुरू आहे. शहरातील एका बड्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी करण्यात आली. एसआयटीकडून व्यावसायिकाची सखोल चौकशी करण्यात आली असून आर्थिक संबंधांचीही तपासणी केली गेली. खरातच्या जमीन खरेदी विक्रीत भागीदारी असल्याच्या माहितीवरून ही चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. चौकशी करून या बड्या हॉटेल व्यवसायिकाला रात्री उशिरा सोडण्यात आलं. भोंदू अशोक खरातची उद्या पोलिस कोठडी संपणार असल्याने पुन्हा उद्या त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे. त्याआधी वेगवेगळ्या मुद्द्यावर एसआयटीकडून वेगाने तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : रक्षाबंधनाच्या सुट्टीत भावंडांसोबत फिरायचंय? मुंबईजवळची 'हे' पावसाळी पिकनिक स्पॉट्स ठरतील परफेक्ट

Salman Khan Video : 'बिग बॉस २०' मध्ये मोठा ट्विस्ट; स्वतःच्याच चक्रव्यूहात अडकणार सदस्य, सलमान खानने दिला इशारा, म्हणाला- "तथास्तु-टू"

Maharashtra News Live Update : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर

Rain Update : राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, मुंबईसह ११ जिल्ह्यांना यलो अलर्ट, वाचा हवामानाचा अंदाज

Wakad Tourism: एका दिवसाच्या सुट्टीत फिरून यायचंय? वाकडजवळच्या 'या' ठिकाणांचा अनुभन तुम्ही घेतलाच पाहिजे

SCROLL FOR NEXT