Nashik earthquake tremors force residents to rush out as cracks appear in houses in Dindori villages saam tv
Video

Nashik Earthquakes: रात्रीच्या दहा वाजता जमीन थरथरली, भूकंपाच्या धक्क्यांनी घरांच्या भितींना भले मोठे तडे, नागरिकांची पळापळ

Nashik Dindori Earthquake Cracks In Houses After Tremors: नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात रात्री १० वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. 3.8 रिश्टर स्केलच्या या भूकंपामुळे घरांना तडे गेले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Omkar Sonawane

अजय सोनवणे, साम टीव्ही

नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील अनेक गावात रात्री 10 वाजेनंतर भूकंपाचे धक्के जाणवले असून कुठे सौम्य तर कुठे त्याचे प्रमाण मोठ्या स्वरूपात असल्याने नागरिक भयभीत होऊन घराच्या बाहेर पडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरगाणा तालुक्यात असेच रोज धक्के जाणवले होते. मात्र, आता दिंडोरी तालुक्यात प्रथमच रात्रीच्या सुमारास होत असलेल्या भूकंपाच्या धक्क्याने नागरिक धास्तावले आहे, मिळालेल्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता 3.8 रिश्टर स्केल इतकी नोंदवली आहे. गेल्या आठवडाभरात जिल्ह्याच्या पश्चिम भागात सुरगाणा, कळवण, पेठ आणि दिंडोरी तालुक्यांतील काही भागांमध्ये सातत्याने भूकंपाचे धक्के बसत आहे. आता जाणवलेल्या भूकंपाच्या धक्यांनी घरांच्या भिंतीना तडे गेले आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बाभुळगांव वरून आंदोलक विद्यार्थी अमरावतीसाठी रवाना

Shocking : "..तू पण माझ्यावर प्रेम कर" एकतर्फी प्रेमातून तरुणीने संपवले आयुष्य; सांगलीतील धक्कादायक घटना

8th Pay Commission: ₹18,000 वरून पगार थेट ₹72,000? 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, जाणून घ्या संपूर्ण गणित

Famous Actor : मृत्यूच्या दाढेतून परतला प्रसिद्ध अभिनेता! "काही तासांपूर्वी आम्ही तिथेच होतो..." सांगताना अंगावर आला काटा

Actress Injured: चेहऱ्यावर सूज अन् ओठांवर जखमा! प्रसिद्ध अभिनेत्रीची अवस्था पाहून चाहते हादरले; सांगितला धक्कादायक अनुभव

SCROLL FOR NEXT