Ashok Kharat Case Saam Tv
Video

Ashok Kharat Case: बायको कुठे देवालाच माहित...; अशोक खरातचं पोलिस कोठडीत उत्तर

Ashok Kharat Case Update: भोंदू अशोक खरातची पत्नी अनेक दिवसांपासून गायब आहे. पोलिस कल्पना खरातचा शोध घेत आहेत. याबाबत अशोक खरातही वारंवार विचारणा करण्यात येत आहे.

Siddhi Hande

भोंदू अशोक खरात सध्या पोलिस कोठडीत आहे. पोलिस कोठडीच्या पहिल्या दोन दिवसांत पोलिसांचे भविष्य सांगणारा भोंदू अशोक खरात आता आपल्याच भविष्याबद्दल चिंतीत आहे. आपण लवकरच तुरुंगातून बाहेर पडणार नाही, याची खात्री त्याला झाल्याची माहिती तपास पथकातील सूत्रांनी दिली. खरात कोठडीत जास्त बोलत नाही, जेवणही कमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. न्यायालयातील सुनावणी व्हिसीद्वारेच व्हावी, असे खरात अधिकाऱ्यांना वारंवार सांगत आहे. खरातला तपास अधिकाऱ्यांनी पत्नी कल्पना कुठे असेल? याबाबत पुन्हा पुन्हा विचारले असता, देवालाच माहीत, असे उत्तर त्याने दिले. मात्र मुलगा हर्षवर्धन हा खरातचा घरात सर्वात लाडका आहे. त्यामुळे मुलाशी फोनवर बोलू देण्याची विनंती तो तपास यंत्रणांना करत असून मुलाची काळजी वाटते, असे तो वारंवार बोलून दाखवतोय, अशी माहितीही सूत्रांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : Mumbai: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात माजी महापौरांच्या पतीची ७ तासांपासून चौकशी

बहीण भावाच्या नात्याला काळिमा! वारंवार अत्याचार केल्याने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म

फाटलेल्या टाचांमुळे त्रस्त आहात? स्वयंपाकघरातील या ५ गोष्टी भरून काढतील भेगा

भाजपच्या माजी खासदाराच्या ताफ्यातील कारचा अपघात; पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

Chanakya Niti: चाणक्यांच्या या ६ सवयी करा फॉलो अन् व्हा मालामाल

SCROLL FOR NEXT