MP Naresh Mhaske addressing media after criticizing Uddhav Thackeray over the Mumbai Mayor issue. Saam Tv
Video

Maharashtra Politics: तेव्हा मूग गिळून का बसले होते? खासदार नरेश म्हस्केंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल|VIDEO

Naresh Mhaske Targets Uddhav Thackeray: शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. महापौर पदाच्या विषयावर आणि विरोधकांच्या सत्याच्या मोर्चावरून त्यांनी उद्धव ठाकरे यांना मूग गिळून बसल्याचा टोला लगावला.

Omkar Sonawane

शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा निशाणा साधला आहे. कोणी गाऱ्हाणं घातलंय. महापौर होऊ दे म्हणून! हे बघा, स्वप्न बघण्याचा अधिकार सगळ्यांनाच असतो. पण मागच्या वेळेस महापौर कसे आले हे सगळ्यांना ठाऊक आहे. शिंदे साहेबांनी विनंती केली होती फडणवीस साहेबांना, तेव्हाच महापौर आले. त्यांना त्यांच्या स्वप्नासाठी शुभेच्छा!

म्हस्के यांनी मुंबईतील ‘सत्याच्या मोर्चा’वर विरोधकांना चांगलंच सुनावलं. ते म्हणाले, मोर्चात कोणाची ताकद होती? शेकाप, राष्ट्रवादी, कम्युनिस्ट... यांचा मुंबईत काही प्रभाव आहे का? काँग्रेसचे प्रमुख नेते कुठे होते? फक्त चुकीचा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांनी मतदार याद्यांतील दुबार नावांच्या मुद्द्यावरून विरोधकांची कोंडी केली. हा विषय नवीन नाही. उद्धव ठाकरे युतीत असताना गफला झाला होता का? त्या वेळी मूग गिळून बसले होते काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कल्याण-नगर मार्गावरील शहाड उड्डाणपूल अवजड वाहनांसाठी २० दिवस बंद, पर्यायी रस्ता कोणता?

Daya Dongre Passes Away: मराठी सिनेसृष्टीचा तारा निखळला; 'खाष्ट सासू' काळाच्या पडद्याआड, मनोरंजन विश्वावर शोककळा

वेट लॉससाठी दिवसभरात किती चपात्या खाव्या? डिनरमध्ये चपातीसोबत खा 'हा' पदार्थ, कारण..

Diabetes Diet: साखरेवर नियंत्रण ठेवायचंय? तर डायबिटीजच्या रुग्णांसाठी अमृत असणारं हे हिरवे पान खा

गर्लफ्रेंडचं लग्न झालं, 24x7 लक्ष ठेवण्यासाठी बॉयफ्रेंडनं झुडुपात कॅमेरा बसवला, पतीनं पाहताच.. नेमकं घडलं काय?

SCROLL FOR NEXT