heavy rain destruction in Nandurbar farms Saam Tv
Video

पंचनाम्यासाठी तलाठ्यांकडून बहाणे; शेतकरी संतापले|VIDEO

Heavy Rain Destruction In Nandurbar Farms: नंदुरबारमध्ये वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तलाठ्यांच्या पंचनाम्याच्या उशिरामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप वाढला असून तहसीलदारांनी नुकसान पंचनाम्याची प्रक्रिया लवकर करण्याचे आश्वासन दिले आहे.

Omkar Sonawane

नंदुरबार: काल सायंकाळी नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसामुळे नंदुरबार व आष्टे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषत: चौपाडे शिवारातील शेतकऱ्यांच्या उभ्या शेतातील पीक पूर्णपणे नष्ट झाले आहे. हाता-तोंडाशी आलेला धान्याचा भाजीपाला आणि इतर उत्पन्न नष्ट झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले आहेत.

आष्टे व चौपाडे भागातील शेतकऱ्यांनी नुकसान पंचनाम्यासाठी तहसील प्रशासनाला अनेकदा विनंती केली. मात्र, तलाठी पंचनामा करण्यासाठी बहाणे करून टाळाटाळ करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा संताप झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, तहसीलदार प्रदीप पवार बांधावर पोहोचले तेव्हा नुकसानग्रस्त शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले. शेतकऱ्यांनी तलाठ्यांच्या दुर्लक्षाविरुद्ध तहसीलदारांकडे थेट तक्रार नोंदवली.

तहसीलदारांनी शेतकऱ्यांना धीर देत स्पष्ट केले की, तलाठ्यावर कायदेशीर नोटीस देऊन नुकसान पंचनाम्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल. त्यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले की प्रशासन त्यांच्या न्याय्य हक्कासाठी तातडीने पावले उचलेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

Truck Accident: काळरात्र! नवरात्रीत दर्शनासाठी निघालेल्या भाविकांना चिरडले, १२ जणांचा मृत्यू, २९ जखमी

Mumbai : मुंबईत रात्री गोळीबाराचा थरार; ओलामधून आले अन् ३ राऊंड फायर, उत्तर प्रदेश कनेक्शन समोर

Festive Season Deals : दिवाळी की दसरा? कार खरेदीसाठी कोणता सण निवडाल?

Sunday Horoscope: रखडलेली कामं पूर्ण करा, ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT