Nandurbar Dragon Farming Video  Saam TV
Video

Nandurbar Dragon Farming Video | कोरडवाहू जमिनीत 12वी पास शेतकऱ्याने करुन दाखवलं!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सातपुड्यात कोरडवाहू आणि खडकाळ जमीन तर आहेच.. पण, त्यासोबतच पाण्याची कमतरता देखील आहे.. यामुळे इथल्या शेतकऱ्यांना असंख्य अडचणींना समोरे जावं लागतं.. पण, मनात जिद्द आणि काहीतरी नवीन करण्याची धमक असेल.. तर पर्याय निर्माण केले जाऊ शकतात.. ही बाब नंदुरबारच्या दिलीप पाडवी या युवा शेतकऱ्याने सिद्ध करुन दाखवली... या तरुण शेतऱ्याने आपल्या शेतीत थेट विदेशी ड्रॅगन फ्रूट यशस्वी प्रयोग केला आहे. नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील डाब वालंबा या दुर्गम भागातील हा शेतकरी... काळाच्या ओघात शेतीचे स्वरुप बदलत असले तरी शेतीमध्ये काय राम आहे? असे म्हणणारे पावलोपावली भेटतातच पण युवा शेतकरी दिलीप पाडवी याला अपवाद आहेत. ज्या अक्ककुवा तालुक्यातील फक्त पावसाळी पिके घेतली जात होती त्या भागात आता हा जिगरबाज शेतकरी बारामाही ड्रॅगन फ्रुटचे उत्पादन घेतो...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND-W vs NZ -W: टीम इंडियाच्या फलंदाजांचा फ्लॉप शो! पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून दारुण पराभव

Pune News: पुण्याचं बदलापूर होतंय, वाचा स्पेशल रिपोर्ट...

MIM महाविकास आघाडीत सहभागी होणार? कोणत्या भागातून मागितल्या जागा? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मराठा आंदोलकांचे गुन्हे मागे घ्या, एसआयटी रद्द करा; काँग्रेस आमदारांची सरकारकडे मागणी

Healthy Relationship साठी या सोप्या ट्रिक्स करा फॉलो...

SCROLL FOR NEXT