Maharashtra News Live Update: सौरव दास आणि आशुतोष रांका यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Marathi Breaking Live Headlines Updates : नवरात्रौउत्सव, सीजीपीचे दिल्लीत आंदोलन, ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी, महाराष्ट्रात राजू शेट्टींचे आंदोलन, देशातील राजकीय घडामोडी, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live UpdateSaam Tv News

CJP च्या सौरव दास आणि आशुतोष रांका यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी

सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. जंतरमंतरवर विनापरवानगी आंदोलन केल्याचा आरोप यांच्यावर आहे. त्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. सरकारने तुरूंगात पाठवले तरी घाबरणार नाही, अशी प्रतिक्रिया CJP चे अक्षय शिंदे यांनी दिली आहे.

कोगनोळीतील आंदोलनाचा भाजीपाल्याला फटका; दरात ३० ते ४० टक्क्यांनी वाढ

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील कोगनोळी टोलनाक्यावर सुरू असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बेमुदत महामार्ग रोको आंदोलनाचा फटका आता थेट कोल्हापूरच्या भाजीपाला बाजाराला बसू लागला आहे. दोन्ही राज्यांच्या सीमेवर भाजीपाला आणि नाशवंत मालाची वाहतूक करणारे ट्रक आणि कंटेनर अडकून पडल्याने कोल्हापूरच्या बाजारात भाजीपाल्याची आवक घटली आहे. याचा परिणाम दरांवर झाला असून, काही भाज्यांच्या किमतीत ३० ते ४० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आधीच महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला आता आणखी कात्री लागणार आहे.

महाराष्ट्रात ऑक्टोबर हीट कायम; कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज

आज राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याची शक्यता

कोकणात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज; ठाणे,मुंबई आणि रायगड जिल्ह्यांना येलो अलर्ट

रत्नागिरी, पुणे, सातारा, बीड आणि जालना जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअसच्या पुढे; दुपारच्या वेळी उन्हाचा तीव्र चटका

रत्नागिरी येथे ३९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद; मालेगाव आणि मुंबईतील सांताक्रूझ येथे ३८ अंशांपेक्षा अधिक तापमान

नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट? महापालिकेने मागितले ८ टीएमसी पाणी; १५ ऑक्टोबरनंतर होणार अंतिम निर्णय

नाशिक शहराच्या आगामी पाणीपुरवठ्याबाबतचा महत्त्वाचा निर्णय १५ ऑक्टोबरनंतर होणार आहे. महापालिकेने यंदाच्या पाणी आरक्षणासाठी एकूण ८ टीएमसी (अंदाजे ७,९९५ दलघफू) पाण्याची मागणी केली आहे. मागणीनुसार पाणी कोटा मंजूर न झाल्यास, शहरात पाणीकपातीची शक्यता वर्तवली जात आहे. १५ ऑक्टोबर २०२६ ते ३१ ऑगस्ट २०२७ या कालावधीसाठी हे पाणी आरक्षित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

संभाजीनगरमध्ये काँग्रेसचा जनआक्रोश दुष्काळ मोर्चा

मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये जनआक्रोश दुष्काळ मोर्चा काढण्यात येणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली दुपारी 12 वाजता पैठण गेट येथून या मोर्चाला सुरुवात होणार असून, तो विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत जाणार आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये आर्थिक मदत द्यावी, तसेच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी मागण्या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. या मोर्चात विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, बाळासाहेब थोरात, खासदार कल्याण काळे, खासदार रवींद्र चव्हाण आणि शिवाजीराव काळगे यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख नेते सहभागी होणार आहेत.

फडणवीसांची शिष्टाई यशस्वी, भाजपचे बंडखोर प्रा. अनिल सोले यांची अखेर माघार

- बंडखोरांची नाराजी दूर! अनिल सोले आणि माजी आमदार गिरीश व्यास यांची निवडणूक समितीत सहप्रभारीपदी नियुक्ती.

- बावनकुळेंच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन सोले समर्थकांच्या बैठकीत आगामी निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा.

- 'झाले गेले विसरून कामाला लागा!' प्रा. अनिल सोले यांचे समर्थकांना एकजुटीचे आवाहन.

- सुधाकर कोहळे यांच्या प्रचाराला बळ भाजपकडून पदवीधर निवडणुकीसाठी एकजुटीचे प्रयत्न.

ऊसदराच्या आंदोलनामुळे कोगनोळी टोलनाक्यावरील वाहतूक ठप्प; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

ऊसदर, इथेनॉलच्या दरासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील कोगनोळी टोलनाक्याजवळ सुरू असलेल्या आंदोलनामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. १३ ऑक्टोबरच्या सकाळपासून सुरू असलेले आंदोलन अद्याप सुरूच असल्याने कोल्हापूरहून बेळगाव आणि बंगळूरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी प्रवासाचे नियोजन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन विशेष पोलिस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी केले आहे.

पुण्यातील एमपीएससी आंदोलन भाषणांनी गाजवणाऱ्या विवेकानंद पाटीलच कोल्हापुरात जल्लोषात स्वागत

पुण्यातल्या एम पी एस सी आंदोलनात आक्रमक भाषण करत सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या विवेकानंद पाटील याचं जंगी स्वागत करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यातील माजगाव येथे रात्री गावकऱ्यांच्या वतीने डॉल्बीच्या दणदणाटात विवेकानंद पाटीलचे स्वागत करण्यात आले. यावेळी गावकऱ्यांनी पुष्पहार घालत त्याचं औक्षण ही केला आहे. यावेळी विवेकानंद सोबत त्याचे आई-वडीलही या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. विवेकानंद च्या आक्रमक भाषाशैलीने महाराष्ट्रातील तमाम युवकांना भुरळ घातली. या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी विवेकानंद जल्लोषात स्वागत केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com