Nanded SAAM TV
Video

Nanded : शासकीय रुग्णालयात सुरक्षारक्षकाची रुग्णाच्या वडिलांवर दमदाटी, व्हिडिओ व्हायरल

Nanded Vishnupuri Hospital Incident नांदेडच्या विष्णुपुरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरक्षारक्षकाच्या दादागिरीचा प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नांदेडच्या विष्णुपुरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरक्षारक्षकाच्या दादागिरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भोकर तालुक्यातील खंडेराव शेंडगे आपल्या 12 वर्षांच्या मुलाला डोक्याला मार लागल्याने उपचारासाठी रुग्णालयात घेऊन आले होते. मात्र, रुग्णालयात प्रवेश करताच चिमुकल्याला उलटी झाली,आणि उपचार देण्याऐवजी सुरक्षारक्षकांनी वडिलांनाच ती उलटी साफ करण्यासाठी भाग पाडले. वाद झाल्यानंतर आणि दमदाटी केल्यानंतरच उपचार सुरू करण्यात आले. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या व्हिडिओमध्ये रुग्णाचे नातेवाईक प्रचंड चिडलेले दिसून येत आहेत. नागरिकांकडून संबंधित सुरक्षारक्षकावर कारवाईची मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत खालवली; तातडीनं रुग्णालयात दाखल

विधानपरिषद निवडणुकीत शिंदेसेना-भाजप आमनेसामने; महायुतीतला वाद चव्हाट्यावर

रामलीला मैदानावर रावणासोबत झुरळही जाळणार; स्वच्छ भारत अभियानाचा दावा की राजकीय निशाणा?

CJPच्या आंदोलनाआधीच दिपके पोलिसांच्या ताब्यात; दिल्लीत पुन्हा एकदा हायव्होल्टेज ड्रामा

तिकीट तपासणीवरून महिला प्रवासीचा टीसीसोबत वाद; कांदिवली स्टेशनवर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT