Nanded Rain VIDEO Saam Tv
Video

Nanded Rain VIDEO : नांदेडमध्ये पावसाचा कहर, विष्णुपुरी धरण ओव्हरफ्लो; सगळीकडे पाणीच पाणी

Vishnupuri dam Overflow Godavari river : नांदेडच्या विष्णुपुरी धरणाचे १२ दरवाजे उघडले आहेत. गोदावरी नदीने धोकापातळी ओलांडली आहे.

Rohini Gudaghe

मुंबई : नांदेड जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून सतत पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं समोर येतंय. जिल्ह्यातील सर्वच नदी नाल्यांना पूर आला आहे. परभणी, हिंगोली या जिल्ह्यात मोठा पाऊस झाल्याने नांदेडचे विष्णूपुरी धरण तुडुंब भरलेय. धरण भरल्यामुळे विष्णुपुरी धरणाचे बारा दरवाजे उघडण्यात आले आहेत. विष्णुपुरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झालाय. गोदावरी नदी काठोकाठ भरलीय.

विष्णुपुरी धरणामधून गोदावरी नदी पात्रात एक लाख ७० हजार क्यूसेक्स वेगाने गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. थोड्याच वेळात अजून २ दरवाजे उघडण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलाय. नांदेडच्या विष्णुपुरी धरणाचे बाराही दरवाजे उघडले. नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे संबंधित प्रशासन अलर्ट मोडमध्ये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT