Nanded Flood Saam Tv
Video

Nanded: २० लाखांची मदत! अजित गोपछडेंचा पूरग्रस्तांना मदतीचा हात, गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

Nanded Flood: नांदेडमध्ये आलेल्या पूरामुळे अनेक गावंच्या गावं उद्ध्वस्त झाली. पूरामुळे घरं पडली, संसार उपयोगी साहित्य वाहून गेले. या पूरानंतर खासदार अजित गोपछडे यांनी गावकऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला.

Priya More

नांदेडच्या मुखेड तालुक्यातील हसनाळ, रावणगाव यासह २२ गावांना पुराचा मोठा फटका बसला. हसनाळ, रावणगाव ही गावे अक्षरशः पुराच्या पाण्यात गाडली गेली. यात ५ जणांचा मृत्यू तर अनेक जनावरे दगावली आहेत. जमीन उध्वस्त झालेल्या या गावांना पुन्हा उभं करण्यासाठी अनेकांचे मदतीचे हात आता समोर येत आहेत. भाजपाचे राज्यसभेचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी या पूर्वग्रस्त भागाचा दौरा केला. हसनाळ, रावणगाव या गावांना गोपछडे यांनी भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला.

गावकऱ्यांचा मोडलेला संसार उभा करण्यासाठी अजित गोपछडे यांनी आपल्या खासदार निधीतून २० लाख रुपये देण्याची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राष्ट्रीय आपदा निधीतून या गावांना विशेष पॅकेज देण्यासाठी आपण मागणी करणार असल्याचे गोपछडे म्हणाले. पुराने उध्वस्त झालेल्या गावांना सरकार पुन्हा नव्याने उभे करणार असून सरकार गावकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही यावेळी खासदार अजित गोपछडे यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Price Hike: मुंबई-पुण्यात घराचं स्वप्न महागणार! सर्वसामान्यांच्या खिशाला झळ, घराची किंमत का वाढतेय?

Buldhana Crime News : जुन्या वैमनस्यातून एकाची भररस्त्यात हत्या; रायपूर पोलिसांकडून तिघांना अटक

Maharashtra Politics : मनसेला मोठं खिंडार, एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना जोरदार धक्का

Maharashtra Live News Update: जमीन घोटाळ्यात शिरसाट यांचा हात, रोहित पवारांचा गंभीर आरोप

Samsung Galaxy S25 FE स्पेसिफिकेशन्स आणि रंग पर्याय लीक, 'या' दिवशी होऊ शकतो लाँच

SCROLL FOR NEXT