Nana Patole SaamTv
Video

Nana Patole : 'मला बाजूला केलं नाही, आमच्यात भांडण लावू नका'; नाना पटोलेंची प्रतिक्रिया

Congress News Update : कॉंग्रेस हायकमांडने आज बाळासाहेब थोरात यांना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी पाठवलं. त्याविषयी नाना पटोले यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

Saam Tv

खासदार संजय राऊत आणि कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील वादानंतर महाविकास आघाडीत देखील वादंग उठलं. त्यामुळे आज कॉंग्रेस हायकमांडने पटोले यांच्या ऐवजी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करायला पाठवलं. मात्र यावर प्रतिक्रिया देताना आपल्याला हायकमांडने बाजूला केलं नसून आपणच यासाठी थोरात यांचं नाव सुचवलं असल्याचं नाना पटोले यांनी म्हंटलं आहे. यावेळी मविआत कोणताही वाद नसल्याचं देखील नाना पटोले यांनी म्हंटलं आहे.

खासदार संजय राऊत आणि कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात जागावाटपावरून झालेल्या वादाने महाविकास आघाडीत फुट पडण्याची वेळ आली होती. त्यामुळे आता हा जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी कॉंग्रेसने आज बाळासाहेब थोरात यांना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी पाठवल्याने नाना पटोले यांना बाजूला केल्याचं बोललं जात होतं. मात्र त्यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देताना हायकमांडने मला बाजूला केलं नसून मीच यासाठी थोरात यांचं नाव सुचवलं आहे. महाविकास आघाडीत वाद नाही. माध्यमांनी उगाच आमच्यात भांडण लावू नये', असं म्हंटलं आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: भास्कर जाधव यांची विधानसभा गटनेते पदी नियुक्ती

IPL Mega Auction 2025 Live News: आज किती खेळाडूंचं नशीब चमकणार; कोणावर लागणार कोटींची बोली?

तुमच्या वजनानुसार तुम्ही किती पाणी प्यायलं पाहिजे?

Gold-Silver Prices: सोन्याच्या भावात झाली घसरण, पाहा १० ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागणार?

Raveena Tandon: 'राजकरणात आली तर मला गोळ्या घालतील'; रवीना टंडनला कोणाची भीती?

SCROLL FOR NEXT