Mukhyamantri Yuva Training Scheme protest in Nagpur Saam Tv
Video

ट्रेनिंग पूर्ण, पण रोजगार दिलं नाही! सरकारच्या विरोधात तरुणांचा लोटांगण मोर्चा, VIDEO|VIDEO

Mukhyamantri Yuva Yojana: मुख्यमंत्री युवाकार्य आणि प्रशिक्षण योजनेतील आश्वासन पूर्ण न झाल्याने नागपूरमध्ये हजारो युवक-युवती आक्रमक झाले. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेकडे निघालेला लोटांगण मोर्चा पोलिसांनी यशवंत स्टेडियम परिसरात अडवला.

Omkar Sonawane

मुख्यमंत्री युवाकार्य आणि प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या हजारो युवक-युवतींनी नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेकडे लोटांगण मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी आंदोलकांना विधानसभेकडे जाण्याआधीच यशवंत स्टेडियम परिसरात अडवले. ११ महिने प्रशिक्षण दिल्यानंतर त्याच ठिकाणी रोजगार देण्याचं आश्वासन सरकारकडून देण्यात आलं होतं.

मात्र हे आश्वासन पूर्ण न झाल्याने प्रशिक्षणार्थी युवक-युवतींमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. ९ तारखेपासून या तरुणांचं आंदोलन सुरू असूनही सरकारकडून कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. यामुळे आज आंदोलन अधिक तीव्र आणि आक्रमक स्वरूपाचं झाल्याचं पाहायला मिळालं. यशवंत स्टेडियम परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून यावेळी विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचे दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dudhi Kofta Recipe : सोप्या पद्धतीने बनवा टेस्टी अन् मसालेदार दुधी कोफ्ता, नोट करा रेसिपी

Maharashtra Live News Update: देशात सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या शहरांपैकी पुण्याचा दुसरा क्रमांक

SBI Recruitment: स्टेट बँकेत नोकरीची संधी; मिळणार ८० लाखांचे पॅकेज; अर्ज करण्याची शेवटची तारीख काय? वाचा सविस्तर

Border 2: सनी देओलचा 'बॉर्डर 2' करणार ग्रँड ओपनिंग; अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये केली बंपर कमाई

Badlapur Crime: स्कूल व्हॅनमध्ये चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीच्या मुसक्या आवळल्या; बदलापूर पुन्हा हादरले

SCROLL FOR NEXT