Nagpur SAAM TV
Video

Nagpur : दह्यामुळे कॅन्सर? नागपुरात ४ हजार किलो दही जप्त,नेमका प्रकार काय? |पाहा VIDEO

Curd Stored in Rusty Containers : निकृष्ट दर्जाचे आणि गंज लागलेल्या डब्यातील दही नागपूर बाजारात विक्रीसाठी आणले होते. अन्न प्रशासन विभागाच्या वेळेवर कारवाईमुळे नागरिकांचा आरोग्यधोका टळला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तुमच्या जेवणाच्या ताटात असलेले दही कॅन्सर सारख्या आजाराला कारणभूत ठरु शकत.नागपूरमध्ये अन्न प्रशासन विभागाने मोठी कारवाई करत तब्बल ४ हजार ४३१ किलो दही जप्त केले आहे. हे दही गंज लागलेल्या २७ लोखंडी डब्यांमध्ये साठवून ठेवण्यात आले होते. तपासात हे दही जबलपूर येथील केसरवाणी डेअरीतून नागपूर बाजारपेठेत विक्रीसाठी आणण्यात आल्याचे समोर आले आहे. जप्त दह्याची बाजारपेठ किंमत सुमारे १ लाख ७७ हजार रुपये इतकी असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. निकृष्ट दर्जाचे आणि अस्वच्छ पद्धतीने साठवलेले हे दही नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण करू शकले असते. त्यामुळे तातडीने ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे तुमच्या ताटात येणारे दही जरी चांगले दिसत असेल तरी ते कश्या पध्दतीने येतय कुठून येत हे सुध्दा तपासणे गरजेचे आहे.अन्यथा तुम्ही कॅन्सर सारख्या आजाराला कारणभूत ठरु शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Bharti: पिंपरी चिंचवड शहर पोलिस भरती; ३२२ पदांसाठी होणार; अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?

Maharashtra Live News Update : मुंबईतील सत्याच्या मोर्चाच्या ठिकाणी महाआघाडीतील नेते उपस्थित

Satyacha Morcha Live : 'सत्याचा मोर्चा आयोगाविरोधात, मग सरकार का नाचतेय? अविनाश जाधवांचा भाजपवर थेट हल्लाबोल

संजय काका, काळजी घे! आदित्य ठाकरेंची संजय राऊतांसाठी खास भावूक पोस्ट; नेमकं काय लिहिलं?

Aadhar Card : आधार कार्डवर नाव कसे अपडेट करायचे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT