A Class 10 student from Nagpur bravely throws a slipper to confirm a leopard entering his house in Bhandewadi. Saam Tv
Video

घरात बिबट्या शिरल्याचा थरार; विद्यार्थ्याने चप्पल फेकून केली खात्री|VIDEO

Nagpur Teen Throws Slipper At Leopard: नागपूरच्या भांडेवाडी परिसरात घरात शिरलेल्या बिबट्याचा सामना दहावीतील विद्यार्थी आलोक राऊतने चप्पल फेकून केला. त्याच्या चलाखीमुळे कुटुंबाला बिबट्या असल्याची खात्री झाली आणि वनविभागाने तत्काळ कारवाई केली.

Omkar Sonawane

नागपूरच्या भांडेवाडी परिसरात आज सकाळी बिबट्या शिरला होता. मात्र शाळेत शिकणाऱ्या एका लहानग्याने चालाकीने बिबट्याचा सामना केला. दहावीत शिकणाऱ्या आलोक राऊतने घरात शिरलेला बिबट्या पहिल्यांदा पाहिल्याचा थरारक अनुभव सांगितला आहे. रोजच्यासारखा कपडे आणायला वर गेलो असता, त्याला बिबट्याचे पाय आणि शेपूट दिसले, ज्यामुळे तो खूप घाबरला. त्याने खाली जाऊन वडिलांना सांगितले, पण त्यांनी सुरुवातीला विश्वास ठेवला नाही. 'मी चप्पल घेतली आणि फेकून मारली, असे सांगत आलोकने बिबट्या असल्याची खात्री करण्यासाठी चप्पल फेकल्याचे म्हटले. त्यानंतर त्याचे वडील वर आले आणि त्यांनीच तो व्हिडिओ काढला. सुरुवातीला भीती वाटली होती, पण आता बिबट्याला घेऊन गेल्याने बरे वाटत असल्याचे आलोकने सांगितले. यापूर्वी कधीही बिबट्या पाहिला नसल्याचेही त्याने स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT