balasaheb Thorat On Rajkot Fort Rada and Vidhan Sabha Elections 2024 SAAM TV
Video

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकांंबाबत महाविकास आघाडीच्या नेत्याची मोठी भविष्यवाणी!

Balasaheb Thorat On Maharashtra Politics : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या बड्या नेत्यानं मोठी भविष्यवाणी केली आहे.

Nandkumar Joshi

संजय राठोड, साम टीव्ही, यवतमाळ

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असतानाच, महाविकास आघाडीतील प्रमुख घटकपक्ष असलेल्या काँग्रेसच्या बड्या नेत्यानं मोठा दावा केला आहे. महाविकास आघाडी १८० जागांवर विजयी होईल, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. ते यवतमाळमध्ये बोलत होते.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. काही प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी तर दौरेही सुरू केले असून, अप्रत्यक्षरित्या प्रचाराचा नारळही फोडला आहे. त्याचवेळी महायुतीतील पक्ष आणि महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये जागावाटपांबाबत चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत बाळासाहेब थोरात यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

महाविकास आघाडी म्हणून आम्ही चर्चा सुरू करत आहोत. लवकरच आम्ही आमच्या जागा निश्चित करण्यासंदर्भात निर्णय घेऊ, असं ते म्हणाले. महाविकास आघाडीचे सगळे नेते एकत्र बसून निर्णय घेतील. महाविकास आघाडीच्या १८० पेक्षा जास्त जागांवरील उमेदवारांचा विधानसभेत विजय होईल, असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला.

छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन मतं मागतात - थोरात

मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर राजकीय वातावरण प्रचंड तापलं आहे. राजकोट किल्ल्यावर काल, बुधवारी ठाकरे गट आणि राणे समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला होता. आता यावर बाळासाहेब थोरात यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

अशा प्रकारच्या घटनांवर राजकारण करू नये, हे समजू शकतो. मात्र, जी अवहेलना छत्रपती शिवाजी महाराजांची झाली, त्यांच्या पुतळ्याची झाली, ती अत्यंत दुःख देऊन जाणारी आहे, हे कोणालाही नाकारता येणार नाही. कशालाही राजकारण म्हणता येणार नाही. महायुतीविरोधात लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. भाजप नेत्यांचं महापुरुषांच्या बाबत बेगडी प्रेम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन मते मागितली जातात. पण त्यांचं प्रेम खरं नसल्याचं सिद्ध झालंय, असं थोरात म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Married Life: वैवाहिक जीवन यशस्वी करायचं , 'या' सवयीचा अवलंब करा..

Maharashtra Exit Poll: तिरोडामध्ये रविकांत बोपचे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Winter Foods: हिवाळ्यात भारतातील या ठिकाणांना भेट देण्याचा विचार करत आहात का? 'हे' पदार्थ नक्की खाऊन बघा..

SCROLL FOR NEXT