Mumbai Water Storage Saam Tv
Video

Mumbai Water Storage: दिलासादायक! मुंबईला पाणी पुरवठा करणारी चार धरणं ओव्हरफ्लो, पाहा VIDEO

Vaitarna Modaksagar Tansa Vaitrana Bhatsa Dam Overflow: मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणारी चार धरणं ओव्हरफ्लो झाल्याचं समोर आलंय.

Rohini Gudaghe

मुंबई : मुंबईच्या पाणीसाठ्यासंदर्भात मोठी अपडेट समोर आलीय. मुंबईला पाणी पुरवठा करणारी चारही धरणं ओव्हर फ्लो झाल्याची माहिती मिळत आहे. तानसा, मोडकसागर, भातसा आणि वैतरणा या चारही धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मुंबईकरांची पाण्याची तहान भागवणारी धरणं आता काठोकाठ भरलेली आहेत. जुलै महिन्यात चांगला पाऊस झालाय. यामुळे धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पाणीसंकटापासून दिलासा मिळालाय.

शहापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे पाणीपातळीत वाढ झाली, तर सर्वात आधी तानसा धरण ओव्हर फ्लो झालं होतं. त्यानंतर मोडकसागर, वैतरणा आणि भातसा ही धरणं ओसांडून वाहू लागली होती. सध्या या चारही धरणांतून विसर्ग सुरू आहे, तर नदीकाठच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. मागील वर्षी कमी पाऊस झाल्यामुळे मुंबईकरांना पाणीसंकटाचा सामना करावा लागला होता. यंदा मात्र, ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला पाणीसाठे पूर्णपणे भरले असल्याचं समोर आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Oscar 2026: करण जोहरच्या 'होमबाउंड'चा ऑस्कर २०२६ मध्ये दबदबा; टॉप १५ चित्रपटांच्या यादीत एन्ट्री

Railway Update: वेटिंग-RAC प्रवाशांना मोठा दिलासा, आता तिकीट स्टेटस 10 तास आधीच पाहता येणार; रेल्वेने नियम बदलले

ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; प्रज्ञा सातव यांच्यानंतर आणखी एक नेता साथ सोडणार

वांगणीत रेल्वे प्रशासनाची 'अशी ही बनवाबनवी'; वनविभागाची परवानगी न घेता भूयारी मार्गाचं काम, चूक लक्षात येताच जागा बदलली

Maharashtra Politics: पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादांनी खेळला डाव, भाजपसह ठाकरे गटाला 'दे धक्का, ८ जणांनी हाती बांधलं घड्याळ

SCROLL FOR NEXT