Students being ferried in boats after schools shut due to heavy rain in Thane. saam tv
Video

ठाण्यात पावसाचा धुमाकूळ, शाळा सोडल्या; विद्यार्थ्यांना बोटीतून नेलं, पाहा VIDEO

Thane Rain : मुंबईसह ठाणे, नवी मुंबई परिसरात पावसानं धुमाकूळ घातलाय. अनेक ठिकाणी पावसाचं पाणी साचलं आहे. मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील शाळेतील विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आलं आहे. कळव्यात शाळा सोडल्यानंतर विद्यार्थ्यांना बोटीतून न्यावं लागलं. हा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

Saam Tv

मुंबई, उपनगरं, ठाणे आणि नवी मुंबईसह राज्याच्या काही भागांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबई, ठाण्याला तर पावसानं झोडपून काढलं आहे. रस्ते, रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. हवामान विभागानं सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. पावसाचा अलर्ट बघता सकाळी भरलेल्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात येत आहे. ठाण्याला लागूनच असलेल्या कळवा भागातही शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात येत आहे. रस्त्यांवर पाणी साचल्यानं विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी तेथील स्थानिक प्रशासन आणि नागरिकही धावले आहेत. काही विद्यार्थ्यांना तर बोटीतून सुरक्षित ठिकाणी सोडण्यात येत आहे. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सायन-पनवेल महामार्गावरही पाणी

मुसळधार पावसामुळं रस्ते वाहतूकही मंदावली आहे. अत्यंत महत्वाच्या अशा सायन-पनवेल महामार्गावरही काही ठिकाणी पावसाचं पाणी साचलं होतं. त्यामुळं वाहतुकीला फटका बसला आहे. दुसरीकडं नवी मुंबई महापालिकेनंही खबरदारी म्हणून विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर केली आहे.

रायगडमध्येही पावसाचा जोर वाढला आहे. आंबा आणि कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली. सावित्री नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. शाळा-महाविद्यालयांना दुपारनंतर सुट्टी देण्यात आली आहे. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: जालन्यातील बदनापूर तालुक्यातील पाडळी शिवारात मुसळधार पाऊस

Maharashtra Government: सरकार शेतकऱ्यांना देणार गुड न्यूज: मुख्यमंत्री लवकरच पूर्ण करणार राज्यातील बळीराजाची मोठी मागणी

Mumbai Local: मध्य रेल्वेला पावसाचा फटका, लोकलसेवा उशिराने; घराकडे निघालेल्या प्रवाशांचे हाल

थँक्स माय फ्रेंड! रशियाच्या पुतिन यांच्या फोननंतर PM मोदींनी मानले आभार, ट्रम्प काय म्हणाले सगळं काही सांगितलं!

Crime : कानशिलात लगावल्याने बायको भडकली, रागाच्या भरात नवऱ्याचा प्रायव्हेट पार्टच कापला

SCROLL FOR NEXT