Mumbai Crime Saam Tv
Video

Mumbai Crime: मुंबई हादरली! भररस्त्यात गोळीबाराचा थरार, एकाच्या पायात घुसली गोळी

Mumbai Firing: मुंबईतल्या डॉकयार्ड रोडवर गोळीबाराची घटना घडली. एका व्यक्तीवर गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळीबारामध्ये ही व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Priya More

मुंबईमध्ये गोळीबाराची घटना घडली. मुंबईतल्या डॉकयार्ड रोड परिसरात गोळीबाराची ही घटना घडली. भररस्त्यात एकावर गोळ्या झाडण्यात आल्या. असिफ दाढीचा मुलगा समीर शेखवर हा गोळीबार करण्यात आला. सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडली. या घटनेत समीर शेखच्या पायाला गोळी लागल्याची माहिती समोर आली आहे. जखमी समीरला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच भायखळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. पोलिस सीसीटीव्ही फूटेज तपासत आहेत. हा हल्ला का करण्यात आला यामागचे कारण अद्याप समोर आले नाही. पण गोळीबाराच्या आवाजाने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यातील मनोरुग्णालयात तरुणाची आत्महत्या, खिडकीला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

इंदिरा गांधींचंही सोनं न खरेदी करण्याचं आवाहन? मोदींसारखाच इंदिरा गांधींचा 1967 साली निर्णय?

आधी डोकी फोडली, आता सत्तेसाठी एकवटली? अंबरनाथ पालिकेत शिंदेसेना-भाजपची युती?

NEET UG परीक्षा रद्द, आता पुढे काय? विद्यार्थ्यांना पुन्हा नोंदणी करून फी भरावी लागणार का?

तामिळनाडूत शिवसेना स्टाईल बंड, अम्माच्या पक्षात उभी फूट

SCROLL FOR NEXT