नालासोपारातील जिजाई नगर परिसरात रस्त्याच्या बाजूला असलेल्या पालिकेच्या तुटलेल्या गटारात महिलेचा पाय अडकल्याची धक्कादायक घटना रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. गटारावर बसविण्यात आलेली लोखंडी जाळी तुटलेल्या अवस्थेत असल्याने महिलेला त्याचा अंदाज आला नाही त्यामध्ये आणि तिचा पाय खोलवर अडकला. या दुर्घटनेत महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत पालिकेच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तुटलेली गटारे आणि धोकादायक अवस्थेतील जाळ्यांकडे पालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.